आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्ता रोको:पीक विम्यासाठी चिखर्डे येथे आंदोलन

बार्शी10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अतिवृष्टीतून वगळलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई व पीक विम्याचा लाभ मिळावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना तसेच चिखर्डे व परिसरातील शेतकऱ्यांनी बार्शी-उस्मानाबाद या मार्गावर चिखर्डे येथे सरकारविरोधी घोषणा देत सुमारे दोन तास रस्ता रोको आंदोलन केले.

नायब तहसीलदार संजीवन मुंढे यांनी आंदोलनस्थळी जावून निदर्शकांकडून निवेदन स्वीकारले. तसेच बार्शी व खांडवी मंडळासह इतरही ८ मंडळांत सततच्या पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीचा व नुकसान भरपाईचा अहवाल शासनास पाठविण्यातआला असल्याचे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...