आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्री श्री रविशंकर व संभाजी ब्रिगेड मध्ये समेट‎:वेबसाईट वरून‎ वादग्रस्त विधान‎ हटवण्याचे मान्य‎

तुळजापूर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल‎ कुलकर्णी यांचा मध्यस्थीने आर्ट‎ ऑफ लिविंगचे श्री श्री रविशंकर व‎ संभाजी ब्रिगेड मध्ये यशस्वी समेट‎ घडवून आणला असून या वेळी‎ झालेल्या चर्चेत श्री श्री रवी शंकर‎ यांनी त्यांच्या वेबसाईट वरून‎ छत्रपती शिवाजी महाराजांचा‎ विषयीचे वादग्रस्त विधान‎ हटवण्याचे मान्य केले आहे.‎ श्री श्री रविशंकर यांच्या‎ वेबसाईटवरील छत्रपती शिवाजी‎ महाराज यांच्याविषयीच्या वादग्रस्त‎ विधानावर आक्षेप घेत संभाजी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ ब्रिगेडने श्री श्री रवी शंकर यांचा‎ तुळजापूर शहरातील संत्संगाचा‎ कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा‎ दिला होता. संभाजी ब्रीगेड च्या‎ इशाऱ्यानंतर पोलिसांनी संभाजी‎ ब्रीगेड च्या ८ ते १० पदाधिकाऱ्यांना‎ कार्यक्रमा पूर्वीच ताब्यात घेत‎ तुळजापूर स्थानबद्ध केले होते. तर‎ रात्री उशिरा पोलीस अधीक्षक‎ अतुल कुलकर्णी यांचा मध्यस्थीने‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ तुळजाभवानी मंदिरात संभाजी‎ ब्रिगेडचे पदाधिकारी व श्री श्री रवी‎ शंकर यांची भेट घालून देण्यात‎ आली.

जिल्हा अध्यक्ष शरद पडवळ‎ यांनी श्री श्री रवी शंकर यांना‎ आवश्यक कागदपत्र तसेच‎ न्यायालयाचा निकालाचा दाखला‎ देत त्यांची चूक निदर्शनास आणून‎ दिली. यानंतर श्री श्री रवी शंकर‎ यांनी माझा काही तसा उद्देश‎ नसल्याचे तसेच मला सांगण्यात‎ तसेच माझ्या ऐकण्यात चूक‎ झाल्याचे मान्य केले. यावेळी‎ पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी‎ यांचा सह सचिव गौस मुलानी, ता.‎ अध्यक्ष बहिरव रणखांब, रोहण‎ लोंढे, विजयसिंह माळी आदी‎ संभाजी ब्रिगेड चे पदाधिकारी‎ उपस्थित होते.‎ दरम्यान च्या काळात श्री श्री रवी‎ शंकर यांचा महासत्संग कार्यक्रमात‎ संभाजी ब्रिगेडच्या उमरगा‎ पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घालत‎ कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न‎ केला. यावेळी माफी मागा - माफी‎ मागा अशी घोषणाबाजी करण्यात‎ आली. या गोंधळाची दखल घेत श्री‎ श्री रवी शंकर यांनी आपल्या‎ सत्संगांमध्ये खुलासा केला.त्यांच्या‎ सत्संगात तुळजापुरात दि. २ रोजी‎ मोठी गर्दी होती.‎

बातम्या आणखी आहेत...