आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ध्यान केंद्रास भेट:अॅग्री कॉलेजच्या विद्यार्थ्यांची हाडोंग्रीतील ध्यान केंद्रास भेट ; विविध प्रजातींची वृक्षलागवड

भूम15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील हाडोंग्री येथील ध्यान केंद्राला उस्मानाबाद येथील डॉ. विखे पाटील शैक्षणिक संकुलातील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास भेट दिली. हाडोंग्री येथे जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी ३०० एकरावर विविध प्रजातींची वृक्षलागवड करुन संगोपन केले आहे.

याची पाहणी करून अभ्यास करण्यासाठी विद्यार्थी आले होते. यावेळी औषधी वनस्पती तसेच विविध फळबागा, रानटी औषधी वनस्पतींचे महत्त्व याबद्दल बाळासाहेब पाटील, आदित्य पाटील व अनुष्का पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ध्यान केंद्रावरील तापमान व त्यापासून दूर चार किलोमीटरवरील तापमानत ३ डिग्रीचा फरक असल्याचे या अभ्यास गटाने सांगितले. ध्यान केंद्रावर हवेत गारवा असल्याचे सांगितले. यावेळी बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर, आदित्य पाटील, अनुष्का पाटील, रासपचे जिल्हाध्यक्ष अॅड. विकास पाटील, रासपचे तालुकाध्यक्ष गजानन सोलनकर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पाटील, प्रा. पाटील, प्रा. शेटे, प्रा. भालेकर , प्राध्यापिका साबळे व वाकळे , प्रा. गुरव, प्रा. नागरगोजे व अशोक सोन्ने यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...