आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबार्शी व धाराशिव परिसरातील २०२-२३वर्षीचा कृषी क्षेत्रात दिला जाणारा राज्यस्तरीय कृषी आयकॉन पुरस्कार भूम तालुक्यातील अंतरगाव येथील प्रगतशील शेतकरी रामराजे गोरे यांना जाहीर झाला आहे. रामराजे गोरे यानी त्यांच्या शेतीत कष्ट व कौशल्याच्या बळावर आधुनिक शेती केली. गोरे आज द्राक्षे, पपई, खरबूज, पेरू, कलिंगड, केळी, चिक्कू आदी फळे व पिके घेत आहेत.
त्यांनी घेतलेली काही फळे विदेशात निर्यात होत आहेत. त्यांच्या शेतातील पिकाची पाहणी करण्यासाठी शेतकरी भेटी देत आहेत. तरुण शेतकऱ्यांसमोर आदर्श असणारे गोरे यांना लवकरच राज्यस्तरीय कृषी आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे, असे प्रमुख विश्वस्त युगदर्शक नितीन भोसले यांनी कळवले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.