आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन:बलसूर येथे अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी, दुचाकी रॅलीतून महामानवांना अभिवादन

उमरगाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

तरुणांनी पुस्तकी ज्ञान व व्यवहाराचा समन्वय साधून समाजासाठी कार्य करावे. जयंतीनिमित्त डॉल्बी लावून घोषणा देण्यापेक्षा महामानवाचे कार्य व विचार आचरणात आणल्यास खऱ्या अर्थाने अभिवादन ठरेल, असे मत रमेश बिराजदार यांनी व्यक्त केले. उमरगा तालुक्यातील बलसूर येथे अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने शुक्रवारी (दि.३) विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. प्रारंभी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त सकाळी नऊ वाजता धनगर समाज मंदिर येथे मूर्तीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर अहिल्यादेवी चौकात पुतळा पूजन बिराजदार यांच्या हस्ते करत अभिवादन करण्यात आले. पुढे बोलताना बिराजदार म्हणाले की, अहिल्यादेवी यांचे कार्य अखंड मानवजातीसाठी होते. तत्कालीन कालखंडात जातीपातीस थारा नव्हता. देशाच्या सामाजिक कार्यामध्ये होळकर घराण्याचे मोठे योगदान आहे. देशाचे संसद भवन व राष्ट्रपती भवन ज्या जागेत उभी आहे ती अहिल्यादेवी होळकरांच्या दौलतीतील आहे. अहिल्यादेवींचे कार्य त्यांचा खरा इतिहास इतिहासकारांनी समाजाला दाखवले नाही, ही समाजपुढील शोकांतिका आहे. एकीकडे अहिल्यादेवी यांचे चांगल लिहायच तर दुसऱ्या बाजूने पती खंडेराव होळकर यांचा सत्य इतिहास न लिहिता दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी सरपंच माधव नांगरे, पवन पाटील, हरी बिराजदार, सुनील नागरे उपस्थित होते. गावातील प्रमुख मार्गावरून दुचाकी फेरी काढुन छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर व संभाजी महाराज पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. उत्सव समितीचे अध्यक्ष म्हाळाप्पा दुधभाते, उपाध्याक्ष संभाजी वाघमोडे, सचिव राम दुधभाते, परमेश्वर वाघमोडे, रावन बनसोडे, नितीन सुरवसे, हनुमंत घोडके, तात्या घोडके, अमोल वाघमोडे, विशाल दुधभाते, अमोल वाघमोडे, आकाश बनसोडे, नागनाथ बनसोडे, तानाजी घोडके, पोलिस नाईक नितीन सुरवसे यांच्यासह धनगर समाजबांधव सहभागी झाले होते. उत्सवाचा महाप्रसादाने सांगता करण्यात आला.