आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकीर्तन महोत्सवातून दान म्हणून आलेल्या रकमेतून वैराग्य महामेरू वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने रघनुंदन महाराज पुजारी यांच्या पुढाकारातून तेर व परिसरातील गरीब, गरजू व पित्याचे छत्र हरवलेल्या १० मुलींच्या शिक्षणासाठी ६५ हजार रुपयांची मदत देण्यात आली. तेर येथे वैराग्य महामेरू वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने भागवत कथा ज्ञानयज्ञ व कीर्तन महोत्सव घेण्यात आला. या महोत्सवात भाविकांनी भरभरून दान दिले. या महोत्सवाच्या समारोपप्रसंगी दानातून शिल्लक राहिलेल्या रकमेतून तेर व गरजू मुलांच्या शिक्षणासाठी मदत करण्यात आली.
यातून दहा गरजू मुलींच्या शिक्षणासाठी मदत करण्यात आली. दिवंगत विजय नाईकवाडी यांच्या ज्ञानेश्वरी, ईश्वरी व सानू या तीन मुलींना मदत देण्यात आली. तसेच कोरोनात वडिलांचे छत्र हरवलेल्या वर्षा दत्ता बनसोडे या अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या मुलीलाही मदत देण्यात आली. प्रणाली पवन गोरे, दुर्गा लोभाजी बगाडे, सुनिता शंकर पेठे यांनाही मदत करण्यात आली. प्रज्ञा भागवत भक्ते, नगमा मोहम्मद मुंडे व भिकार सारोळा येथील सुलताना अमीन शेख या गरजू मुलीला शिक्षणासाठी मदत करण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.