आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:अजितदादा पवार यांना बोलण्यापासून रोखले; राष्ट्रवादीकडून निषेध

उस्मानाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संतांची भूमीची श्रीक्षेत्र देहू येथे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मंगळवारी १४ जून रोजी झालेल्या शिळा लोकार्पणाच्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना बोलण्यापासून रोखणाऱ्या भाजपचा उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र शब्दांत निषेध करुन जोरदार घोषणा दिल्या.

केंद्र सरकारने प्रोटोकॉलच्या नावाखाली जाणीवपूर्वक हा प्रकार केल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. संत तुकाराम महाराजांची भूमी श्रीक्षेत्र देहू येथे मंगळवारी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या उपस्थितीत शिळा लोकार्पण कार्यक्रमात प्रधान मंत्र्यांच्या भाषणापूर्वी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भाषणाची संधी देणे अपेक्षित होते. परंतु त्यांना भाषण करण्यापासून रोखण्याचा भारतीय जनता पार्टीचा हा डाव असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमधून केला जात आहे.

यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, प्रदेश सचिव मसूद शेख, जिल्हा उपाध्यक्ष कादर खान, वाजिद पठाण, जिल्हा सरचिटणीस नितीन बागल, महिला जिल्हाध्यक्ष मनीषा राखुंडे पाटील, उस्मानाबाद कळंब विधानसभा अध्यक्ष अमित शिंदे, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष असद पठाण, उद्योजक जिल्हा अध्यक्ष ॲड.विवेक घोगरे, उस्मानाबाद तालुका अध्यक्ष श्याम घोगरे, शहराध्यक्ष अयाझ शेख, शहर कार्याध्यक्ष सचिन तावडे, नंदकुमार गवारे, शहर उपाध्यक्ष मनोज मुदगल, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महिला, युवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...