आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वार्षिक उत्पन्न:सीमेवरील उजळंब गावात अखंड हरिनाम व ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाची सांगता

उमरगा24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्याच्या सीमेवर असलेल्या उजळंब गावात प्रतिवर्षी मारुती मंदिराशेजारी असलेल्या श्री ज्ञानेश्वर मंदिरात ज्ञानेश्वरी सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. बुधवारी (दि.२५) यंदाच्या सप्ताहाची सांगता मोठ्या उत्साहात काल्याच्या किर्तनाने झाली.कर्नाटकातील बसवकल्याण तालुक्यातील सीमाभागातील निसर्गरम्य अशा ठिकाणी वसलेले उजळंब गाव एकेकाळी पानमळ्यासाठी प्रसिध्द होते. येथील नागरिकांचा शेती हाच प्रमुख व्यवसाय असल्याने प्रत्येक जण शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावरच वार्षिक गणित अवलंबून असायचे. कालांतराने निसर्गाच्या बदलत्या चक्राने येथील शेती व्यवसाय मोडीत निघाला अन येथील युवकांनी कामाच्या शोधात गाव सोडले काही शिक्षित युवकांनी मुंबई, पुणे येथे उद्योग व व्यवसाय सुरु केला तर काहिनी नोकरीनिमित्त आपले गावहि सोडले.

उमरगा शहरात सद्यस्थितीत उजळंब येथील जवळपास ७० टक्क्यांच्यावर व्यावसायिक असून किराणा, कपडे, सराफ, हार्डवेअर, हॉटेल आदी उद्योग व्यवसाय उभारले. प्रतिवर्षी गावात दिवाळीनंतर अखंड हरिनाम सप्ताह व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यानिमित्त सलग सात दिवस उत्सव साजरा करण्यात येतो. यंदाच्या वर्षात २४ ऑक्टोबरपासून अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला सुरुवात झाली.

दररोज पहाटे काकडा, सात ते ११ ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी गाथा भजन, १२ ते दोन महिला भजन, पुराण वाचन, प्रवचन, सायंकाळी हरिपाठ, रात्री हरिजागर झाले.२९ ऑक्टोबर रोजी हभप गुरूबाबा महाराज औसेकर यांचे चक्रीभजन व कीर्तनसेवा झाली. दि ३१ दुपारी काल्याचे कीर्तन झाले.

बातम्या आणखी आहेत...