आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कीर्तनाचे कार्यक्रम:येरमाळा येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

येरमाळा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्री येडेश्वरी देवीच्या नारळी पौर्णिमेनिमित्त येरमाळा येथील विठ्ठल मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.नारळी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी श्री येडेश्वरी देवीची पालखी आबाजी पाटील यांच्या आनंदधाम वाड्यातील विठ्ठल रखुमाई मंदिरात येत असल्याने परंपरागत या काळात हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. हा सप्ताह दि.८-१२ च्य दरम्यान होत असुन या का ळामध्ये विविध कीर्तनकार मंडळी कडून कीर्तनाचे कार्यक्रम होणार आहेत तर शुक्रवार रोजी पालखीचे येडेश्वरी विठ्ठलमंदिरात सायंकाळी ५ आगमन होणार आहे.

दि.१४ रोजी वारकरी दिंडीची देवीच्या पालखीसह नगर प्रदक्षिणा करत मुख्य मंदीर परिसरात ३ वाजेच्या सुमारास दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम होईल याचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन देवीचे मानकरी पाटील परिवाराकडून करण्यात आले आहे.या निमित्त जिल्हयाच्या परिसरातून अनेक भाविक येण्याची अपेक्षा आहे.

बातम्या आणखी आहेत...