आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन:थोडसरवाडीत आजपासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

तेर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संत गोरोबाकाकांच्या पदस्पर्शाने पावन तेर परिसरातील थोडसरवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास बुधवारपासून (दि.५) प्रारंभ होत आहे. सप्ताह कालावधीत दररोज काकडा भजन विष्णू सहस्त्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, गाथा भजन, प्रवचन कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यभरातील नामवंत प्रवचनकार, कीर्तनकारांची सेवा संपन्न होणार आहे.

बुधवारी (दि.५) कसबे महाराज ढोकीकर, संदीपान महाराज हासेगावकर, ६ रोजी चंद्रकांत महाराज खोत, नारायण महाराज उ. पिंपरीकर, ७ रोजी विश्वनाथ महाराज महामुनी, पद्मनाभ महाराज व्यास, ८ रोजी पोपट महाराज वाणेवाडीकर, गंगाधर महाराज खोत, ९ रोजी बाळू महाराज शिनगारे, चौरे महाराज पंढरपूरकर, दि. १० रोजी महेश महाराज भोरे, माधव महाराज बोधले, ११ रोजी किसनगिरी महाराज हिंगळजवाडीकर प्रवचन व कीर्तनाची सेवा देणार आहेत. दि. १२ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत विलास महाराज मुळे जुनोनीकर यांची काल्याचे कीर्तन झाल्यानंतर महाप्रसादाच्या वाटपाने सप्ताह सोहळ्याची सांगता होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...