आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअक्षय तृतीया व रमजान ईद एकाच दिवशी मंगळवारी आल्यामुळे सोमवारी दिवसभर बाजारपेठ गजबजून गेली. अक्षय तृतीयेला आंब्याचा मान असल्यामुळे आंबा तर ईदला शिरखुर्म्याचे साहित्य खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.
दोन्ही सणाला हिंदू व मुस्लिम समाजात मोठे महत्त्व आहे. अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकीच आहे. या दिवशी जे काही केले जाते ते अक्षय टीकते असे सांगितले जाते. यामुळे या दिवशी शुभ काम सुरू केले जाते. त्यात या दिवशी दागिने खरेदी करत असतात. यामुळे उस्मानाबादेतील सराफा कट्टाही सज्ज झाला आहे. तसेच आंबेही सेवन केले जातात. यामुळे आंब्यांचा बाजार बहरला होता. २०० रुपये किलो दराने आंबे विकले जात होते.
ईदलाही मोठे महत्त्व असल्यामुळे शिरखुर्म्याचे साहित्य खरेदी करण्यासाठी शहरातील विविध भागात मोठी गर्दी उसळली होती. ईदला मुस्लिम बांधव सर्वधर्मींयांना शिरखुर्म्याची मेजवानी देतात. यामुळे ही मेजवानी सामाजिक सौहार्द वाढवणारी असते. यामुळे यासाठीही जय्यत तयारी करण्यात आली आहे. दोन्ही सणांच्या आनंदात कोणी विष कालवू नये म्हणून पोलिसांनीही जय्यत तयारी केली आहे.
शिरखुर्म्याचे साहित्य २० टक्क्यांनी वधारले, दरात वाढ होऊनही विक्रमी विक्री
शिरखुर्म्याचे साहित्य म्हणून काजू, बदाम, खोबरे, चारोळी पिस्ता, किसमिस, शेवया, बडीसोप, धनादाळ, टरबजू बी, विलायची आदी वापरले जाते. याच्या दरांमध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तब्बल २० टक्क्यांनी साहित्याचे दर वाढलेले असतानाही शिरखुर्म्याच्या साहित्याची विक्रमी विक्री झाली आहे, असे शहरातील उस्मानाबाद दुकानदार सतीश अंबुरे यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.