आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशारा:रस्तेकामासाठी अलमप्रभू शहर विकास आघाडीचा इशारा

भूम4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पार्डी ते खर्डा या रस्त्यामधील भूम शहर हद्दीतील रस्त्याचे काम तत्काळ सुरू करावे, तसेच तालुक्यातील खड्डे बुजवण्याच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी, अन्यथा अलमप्रभू भूम शहर विकास आघाडी व शहरातील सर्व नागरिकांच्या वतीने माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको करण्याचा इशारा उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

अलमप्रभू भूम शहर विकास आघाडीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यात मे २०२१ पासून पार्डी -भूम-खर्डा या रस्त्याचे काम चालू आहे. मात्र, या रस्त्याचे काम काम संथ गतीने व निकृष्ट दर्जाचे चालू असल्याने हा रस्ता दीर्घ काळासाठी टिकणार नाही. शहराचा परिसर वगळता इतर ठिकाणी काम चालू केलेले आहे. मात्र, शहरात अद्याप काहीही काम केलेले नाही. येत्या दोन महिन्यात हे काम पूर्ण न झाल्यास पावसाळ्यामुळे येथे काम करता येणे शक्य नाही. त्यामुळे शहर परिसरातील काम तातडीने पूर्ण करून घ्यावे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

२० एप्रिलपर्यंत काम चालू न केल्यास २८ एप्रिल रोजी अलमप्रभू भूम शहर विकास आघाडीच्या वतीने गोलाई चौक येथे रस्ता रोको करणार आहे, असा इशारा दिला आहे. याप्रसंगी विकास आघाडीचे अध्यक्ष संजय साबळे, माजी नगरसेवक संजय पवार, माजी नगरसेवक सागर टकले, युवा नेते सुरज गाढवे, लालू पवार, वंचितचे मुकुंद लगाडे, अतुल उपरे, रईस काझी, गफुर सय्यद, बालाजी अंधारे, सुनील थोरात, शैलेश तेरकर, भारत साठे व इतर उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...