आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशारा:भोसा गावात एसटीसाठी आंदोलनाचा इशारा

कळंब11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लहुजी शक्ती सेना कळंब तालुक्यातील महत्त्वाचे गाव असणारे भोसा या गावाला मुख्य रस्ता एन एच २११ सोलापूर औरंगाबाद पर्यंत रस्ता उपलब्ध नसल्यामुळे गावाकऱ्यांचे खुप हाल होतात सदर गाव हे मोठया लोकसंख्या असणारी ग्राम पंचायत म्हणून प्रसिद्ध आहे.

परंतु सदर गावा मध्ये मुख्य बाजार पेठ, दळण वळण व्यवस्था, रोजगार, मार्केट, शैक्षणिक, वैद्यकीय सेवाची अनास्था असल्याकरणाने गावातील हजारो विद्यार्थी, महिला, पुरुष, वृद्ध नांगीरिकांना आसपासच्या गावावरती अवलंबून राहावे लागत असल्यामुळे मुख्य रस्ता NH211 सोलापूर -औरंगाबाद महामार्गाला भोसा गावापासून जोडणारा रस्ता गेल्या २५ वर्षांपासून दयनीय अवस्थेत असल्यामुळे ग्रामस्थ्यांचे खुप हाल होत आहेत. त्याच्याच परिणाम स्वरूप विद्यार्थ्यांच्या भविष्यावर विपरीत परिणाम होत आहेत.

गावाच्या रस्ता येत्या ४८ तासात दुरुस्त करून एसटी सेवा उपलब्ध करून दिल्यास लहुजी शक्ती सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा एका निवेदनाव्दारेे देण्यात आला आहे. या वेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य रोहित भाऊ खलसे, जिल्हा कार्याध्यक्ष संतोष भाऊ मोरे, निखिल भाऊ चांदणे, मुकेश भाऊ शिंदे उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...