आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायंदाच्या मोहा ग्रामपंचायत निवडणुकीत युवापरीवर्तन आघाडीच्या सरपंचासहीत सर्व १५ उमेदवारांनी ऐतिहासिक यश संपादन केल्याची चर्चा जिल्हाभर चालू होती. तद्नंतर उपसरपंच निवडीच्या नियोजित बैठकीमध्ये अध्यायसी अधिकारी व्ही. एस. माटे यांच्या अध्यक्षतेखाली बशारत मोमीन यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे.
बशारत मोमीन पाठीमागे ग्रामपंचायत सदस्य असताना मोहा गावच्या विकासाच्या आवश्यक अशा विधायक मुद्द्यावर प्रखरतेने भूमिका बजावली होती. त्यांनतर त्यांनी मध्यंतरी पाच वर्ष राजकीय खंड देऊन स्वतःला समाजकार्यात झोकून दिले होते. ज्यामधे पाणी फौडेशनसारख्या चळवळीतून मोहा गावची दुष्काळी असणारी परिस्थिती बदलण्यासाठी मोठी मेहनत घेतली होती. त्यांची गाव आणि समाज यांच्यासाठी असणारी तळमळ आज उपसरपंचपदी बसल्यास सत्यात उतरली आहे.
आता त्यांना सत्तेत राहून पूर्णवेळ समाजाला लागणाऱ्या दैंनदिन गरजा आणि त्यावरील कायमस्वरूपी उपाय योजना आखून त्यावर अंमलबजावणी करण्याची गरज आहे. उपसरपंच निवडीच्या बैठकीनंतर सरपंच, उपसरपंच आणि सर्व नूतन सदस्यांचा सत्कार अध्यायासी अधिकारी व्ही. एस. माटे आणि प्रशासक ए. एस. गपाट यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन ग्रामविकास अधिकारी हनुमंत झांबरे यांनी केले. यावेळी पॅनलप्रमुख संदीप मडके, समाजसेवक इम्तियाज मोमीन, सरपंच सीमा संदीप मडके, उपसरपंच बशारत मोमीन, सदस्य सुधीर मडके, पूजा नागटिळक, बिस्मिलाबी शेख, बद्रोद्दीन शेख, रुपाली कसबे, अनिल मडके, जोत्सना कसबे, मीना झोरी, महावीर कसबे, सूरज मडके, साखरबाई काळे, बालाजी मडके, कोमल मडके, मैथिली मडके आदी सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.