आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्र:विधवा प्रथेच्या निर्मूलनासाठी सर्व ग्रामपंचायतींनी ठरावा घ्यावा; गटविकास अधिकाऱ्यांचे कळंब तालुक्यातील ग्रामपंचायतींना पत्र

कळंबएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

समाजात प्रचलित विधवा प्रथेच्या निर्मूलनासाठी कळंब तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी ठरावा घ्यावा, असे पत्र गटविकास अधिकारी आर. व्ही. चकोर यांनी सर्व ग्रामपंचायतींना काढले आहे. यावर ग्रामपंचायती काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.

पतीच्या निधनानंतर पत्नीला समाजात मानाचे स्थान मिळत नाही. धार्मिक कार्यक्रमांपासून वंचित ठेवण्यात येते. पतीच्या निधनावेळी कपाळाचे कुंकू पुसणे, हातातील बांगडया फोडणे, मंगळसूत्र काढणे, पायातील जोडवे काढणे आदी प्रथांचे समाजात पालन केल्या जाते. परिणामी पतीच्या निधनानंतर पत्नीला अवहेलना सहन करावी लागते. विधवा महिलांना धार्मिक, सामाजिक कार्यक्रमात सहभागी होऊ दिले जात नाही. परिणामी व्यक्तीच्या जीवन जगण्याच्या मानवाधिकाराचे व भारतीय संविधानाने बहाल केलेल्या समतेच्या न्याय हक्काचे उल्लंघन होते. दरम्यान विधवा प्रथेचे निर्मूलन करण्याकरिता उपाययोजना आखण्यासंदर्भात लाल पँथर संघटनेच्या वतीने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बजरंग ताटे, जिल्हाध्यक्ष माया शिंदे यांनी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते.

हेरवाडचा दिशादर्शक ठराव
कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने गावात प्रचलित अनिष्ट विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव केला आहे. शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त पुरोगामी विचारांचा हा ठराव दिशादर्शक ठरला आहे. त्यामुळे कळंब तालुक्यातील ग्रामपंचायतींनी सुद्धा याचे अनुकरण करावे, असे मत व्यक्त होत आहे.

बातम्या आणखी आहेत...