आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशासकीय रक्तपेढी जिल्हा रुग्णालय उस्मानाबादच्या वतीने १४ जून रोजी जिल्हा रुग्णालयामध्ये ‘जागतिक रक्तदाता दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते रक्त विलगीकरणाच्या कार्यामध्ये नोबेल पुरस्काराने सन्मानीत डॉ. कार्ल लँन्डस्टिनर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या वेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उस्मानाबादचे अधिष्ठाता डॉ. संजय राठोड म्हणाले की, रक्तदानाच्या बाबतीत असणारे गैरसमज सर्वप्रथम दूर करणे गरजेचे आहे. तसेच जोपर्यंत सर्वसामान्य नागरिकांमध्ये रक्तदानाची चळवळ उभी राहणार नाही, तोपर्यंत आपल्या समाजातील रक्तदानाविषयी असणारे अज्ञान दूर होणार नाही. रक्तदानाबरोबरच आपण अवयवदान करण्यासाठी पुढे यावे, असे त्यांनी यावेळी उपस्थितांना आवाहन केले.
आपल्या प्रास्ताविकात रक्त संक्रमण अधिकारी डॉ. अश्विनी गोरे म्हणाल्या की, १४ जून जागतिक रक्तदाता दिन होता. शासकीय रक्तपेढी व्दारे या दिनाच्या निमित्ताने दिनांक १४ जून ते ३० जून या पंधरावडयात वेगवेगळे उपक्रम राबविणार असून शासकीय रक्तपेढीच्या कामकाजविषयी माहिती दिली. या वर्षीचे घोषवाक्य - ‘रक्तदान हे एकतेचे कार्य आहे, प्रयत्नामध्ये सामील व्हा आणि जीव वाचवा’ याविषयी माहिती देऊन रक्तदानाविषयी उपस्थितांना शपथ दिली. यावेळी रक्तदान करणारे नियमित रक्तदाते व विविध सामाजिक संघटनांचे तसेच सेवाभावी संस्थाचे प्रतिनिधींचे मान्यवरांच्या हस्ते गुलाबाचे रोप व गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी अन्नपुर्णा ग्रुप उस्मानाबाद, शिवराज्य अभिषेक सोहळा समिती उस्मानाबाद, रोटरी क्लब कळंब, सकल शिवजयंती महोत्सव समिती कळंब, साई परिवार उस्मानाबाद, प्रसेना प्रतिष्ठान उस्मानाबाद, अहमदिया मुस्लिम युवा मंच उस्मानाबाद, रौद्र प्रतिष्ठान समता नगर उस्मानाबाद तसेच वयैक्तिक रक्तदाते डॉ. प्रशांत कोथळकर, श्री. व सौ विष्णु इंगळे, महेश वडगावकर, युवराज कुऱ्हाडे, डॉ. विष्णु कुलकर्णी, नामदेव वाघमारे, पांडुरंग सोनकवडे, विकास गाडेकर, ईश्वर भोसले या सर्वांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी काही रक्तदत्यांनी रक्तदान करताना आलेले अनुभव कथन केले. मान्यवरांची उपस्थिती यावेळी शल्यिचिकित्सक डॉ. धनंजय पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तानाजी लाकाळ, डॉ. अशोक कठारे, डॉ. नानासाहेब गोसावी, डॉ. सतिश आदटराव, डॉ. अमोल कापसे, अब्दुल लतिफ, डॉ. बशारत अहमद, अधिसेविका सुमित्रा गोरे उपस्थित होत्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.