आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायंदा पावसाळ्यात सलग तीन महिने रिपरिप आणि सततच्या ढगाळ वातावरणामुळे उसाचा फुटवा झाला नाही. यामुळे जवळपास ४० टक्के उत्पादन घटले असून एकरी ३० टन ऊस निघत आहे. कमी ऊस निघत असल्याने मार्च, एप्रिलमध्येच यंदाचा गळीत हंगाम संपण्याची शक्यता आहे. यंदा जवळपास सर्वच साखर कारखाने सुरू झाल्याने ऊस कमी पडण्याची शक्यता आहे.
यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून मजुरांनाही कमी दिवस मजुरी मिळणार आहे. उमरगा तालुक्यात कधी दुष्काळ, कधी ओला दुष्काळ, अतिवृष्टी, गारांचा अवकाळी पाऊस आदी निसर्गाचे दुष्टचक्र शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. परिणामी, शेतीच्या उत्पादनात कमालीची घट झाली आहे. यातच खत व बियाण्यांच्या वाढलेल्या किंमती, शेतीमालाला मिळणारे कमी दर यामुळे शेती करणे जिकरीचे झाले आहे. यंदाच्या वर्षी सततचा पाऊस, अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. जिल्ह्यात सहकारी आठ तर खासगी आठ साखर कारखाने आहेत. यापैकी विठ्ठलसाई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेउमरगा तालुक्यातील शिवारात उसाच्या फडात कोयत्याचा जोर वाढला आहे.
दोन साखर कारखाने सुरू असून लोहारा येथील लोकमंगल व भाऊसाहेब बिराजदार साखर कारखान्याचे गाळप सुरू आहे. तालुक्यात सोलापूर येथील मातोश्री, कंचेश्वर तुळजापूर यांनी शिरकाव केला आहे. सलग दोन ते अडीच महिने सततचा पाऊस असल्याने ऊस पिकाला सूर्यप्रकाशाची कमतरता भासली. यामुळे उसाची वाढ खुंटली असून हेक्टरी सरासरी ३५ ते ४० टक्के घट येत आहे. परिणामी मार्चमध्ये सर्वच कारखाने बंद होण्याची शक्यता आहे. तालुक्यातील उसाची काही वाढ झाल्याने गाडीचा माल करण्यासाठी जवळपास एक एकर फड तोडावा लागतो. तालुक्यातील दोन साखर कारखाने सुरू झाले असून तुळजापूर, सोलापूर व लोहारा तालुक्यातील कारखान्यांनी शिरकाव केल्याने शेत शिवारात ऊस तोडणी सुरुवात झाली आहे. अद्याप दराचा तिढा सुटला नसला तरी उत्पादित ऊस तोडण्यासाठी शिवारात उसतोडीच्या टोळ्या दिसत आहेत. गाडीला लवकर माल करण्यासाठी कोयतेही लवकर कामाला लागतात. तोडलेला ऊस कारखान्याकडे घेवून जाण्यासाठी ट्रॅक्टर, ट्रक अन् बैलगाड्यांची वर्दळ वाढली असून शिवारात उसाच्या फडासोबत कारखान्यांची ठिकाणे शेतकरी, कामगार आणि वाहनांची वर्दळ वाढली आहे.
दरम्यान, आता ऊस तोडणी मजुरांना पर्याय म्हणून मागील दोन वर्षांपासून ऊस तोडणी यंत्राचा उपयोग सुरू करण्यात आला आहे. सव्वा कोटीची गुंतवणूक करून अनेक शेतकरी ऊस तोडणी यंत्र खरेदीकडे वळले आहेत. बहुतांश कारखान्यांवर सुरू असलेल्या ऊस तोडणी यंत्राची वाहने दोन-तीन दिवसानंतर रिकामी होत आहेत. यामुळे त्याचा व्यवसायावर परिणाम होत आहे. सर्वच साखर कारखान्यांवर जवळपास अशीच परिस्थिती असल्याने यंदाच्या हंगामात ज्यांनी तोडणी यंत्र खरेदी केले आहे, त्यांना बँकेचा हप्ता आणि व्याज परताव्याचा धसका भरला आहे.
कारखान्यांकडून यावर्षी अद्यापही ऊसाचा दर जाहीर नाही
उमरगा-लोहारा तालुक्यात तीन साखर कारखाने सुरू आहेत. दरम्यान, मागील वर्षी भाऊसाहेब बिराजदार कारखान्याने शेतकऱ्यांच्या ऊसाला दोन हजार पाचशे रुपये सर्वाधिक भाव दिला होता. यंदाच्या वर्षात अद्याप दर जाहीर झालेला नाही. लोकमंगल कारखान्याने पहिला हप्ता दोन हजार दोनशे रुपयांचा दिला तर विठ्ठलसाई कारखान्याच्या वतीने दोन हजार तीनशे रुपयांचा पहिला हप्ता काढण्यात आलेला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.