आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात विविध ठिकाणी बोअरवेल मारून पाणी साठवण्यासाठी सिमेंट टाक्या बसवण्यासह पाण्याची पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी भाजयुमोचे जिल्हा चिटणीस श्रमिक पोतदार यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, नळदुर्गला बोरी धरणात पाणी असूनही ८ दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. लोकसंख्येनुसार पाणीसाठा करण्याच्या टाकीची क्षमता कमी आहे.
पाणीपुरवठा विभागात तांत्रिक बिघाड झाला किंवा वीजपुरवठा खंडीत झाला तर दिवसातून २ ते ३ भागातच पाणीपुरवठा होतो. शहरातील अनेक भागात बोरी धरणाच्या पाण्याव्यतिरिक्त इतर स्त्रोत नाही. स्त्रोत आहेत तेथे मोटार बिघाड, जलवाहिनीत गळती आदीमुळे बोअरवेल बंद आहेत. अयोध्यानगर, व्यासनगर, माऊली नगर, रामलीला नगर, व्यंकटेश नगर, ठाकरे नगर, बुध्द विहार, भवानी नगर, आझाद चौक, इंदिरानगर, मुळेनगर, मुळे प्लॉटिंग, रणे प्लॉटिंग अक्कलकोट रोड आदी ठिकाणी पाण्याचा पर्यायी स्त्रोत नाही.
या भागातील नागरिक नळाच्या पाणीपुरवठ्यावरच अवलंबुन आहेत. येथील नागरिकांना पाण्याची सोय होण्यासाठी मारुती मंदिराजवळ अयोध्यानगर, व्यासनगर, माऊली नगर (ओपन स्पेस), रामलीला नगर, व्यंकटेश नगर, ठाकरे नगर (ओपन स्पेस), बुद्ध विहार, नगरपालिका कॉम्प्लेक्स जवळ, भवानी नगर, आझाद चौक, इंदिरा नगर (मोटार दुरुस्ती), मुळे नगर, मुळे प्लॉटिंग, मरिआई मंदिराजवळ, तसेच अक्कलकोट रोड, रणे प्लॉटिंग साठे नगर (मोटार दुरुस्ती/पाइप बदलणे) या सर्व ठिकाणी नवीन बोअरवेल घेऊन सिमेंटच्या टाक्या बसवाव्या. सर्व बोअरचे सर्व्हे करुन त्यांची सद्यस्थिती तपासावी व आवश्यक ती कार्यवाही करुन नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सोडवावा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.