आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेटीएम महाविद्यालयात शिकणाऱ्या १९९० च्या पदवी परीक्षेत पास झालेल्या वर्गमित्रांचे स्नेहसंमेलन झाले. ३२ वर्षांनंतर एकत्र आलेल्या मित्रांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. केटीएचएम महाविद्यालयाच्या मैदानावर जवळपास २५ मित्र जमले. राजाभाऊ साखरे यांनी सर्वांना फेटे बांधून स्नेहमेळाव्यास अनोख्या पद्धतीने सुरुवात केली. उपस्थित सर्व मित्रांनी कॉलेजच्या समोर फोटो काढले. कॉलेजच्या आवारात आल्याने ३२ वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा मिळाला. याप्रसंगी विजय देवरे, विलास कोटमे, रायभान दवंगे, कोंडाजी चव्हाण, बाळासाहेब लिलके, संजय फड, दत्तात्रय लिलके, ज्ञानेश्वर माउली, प्रदीप आहेर, संजय कदम, भीमाजी ढिकले, केवळ देवरे, भानुदास मोगल, राजू नाकील, भगवान तिखे, ताडगे, शेखर बिरारी, गजानन रावळे, मोहन देवडे, रमेश चव्हाण, संजय बाविस्कर, गंगाधर कदम, सुनील गायकवाड अादी उपस्थित होते.
मेळाव्याच्या सुरुवातीलाच सर्व मित्रांनी आपला ओळख परिचय करून दिला. प्रा. सीताराम निकम यांनी प्रसिद्ध कवी नारायण सुर्वे यांची प्रसिद्ध कविता “असं तुम्ही पत्रात लिवा” सादर केली. या कवितेने उपस्थितांचे मन जिंकले. त्यानंतर विजय निकुंभ यांनी कॉलेजमध्ये शिकत असताना स्नेहसंमेलनात सादर केलेले गीत ‘जाने कहाँ गये वो दिन....!’ हे गीत सादर कॉलेज जीवनातील आठवणींना उजाळा दिला. या गाण्याला उपस्थितांनी भरभरून दाद दिली व त्यांनी कॉलेज जीवनामध्ये सादर केलेल्या “मेरा जूता है, जापानी...! हे गीत सादर केले.
असे म्हणतात बऱ्याच आजारांवर गोळ्या-औषधाने उपचार होत नाही, ते मित्रांबरोबर काही तास घालवल्यावर होतो व मनातील सर्वप्रकारच्या समस्यांचे उत्तर मिळते याचा अनुभव सर्व मित्रांनी घेतला. याप्रसंगी उपस्थितांनी एकमेकांच्या सुख-दुःखामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.