आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:माजी विद्यार्थ्यांनी शाळेस दिले 25 सिलिंग फॅन भेट ; लाेहारा जिल्हा परिषद शाळेत कार्यक्रम

लोहाराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधून लोहारा शहरातील जिल्हा परिषद शाळेतील १९९३ मध्ये पाहिलीमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांनी शाळेत सोमवारी (दि.३१) माजी विद्यार्थी व शिक्षक मेळावा आयोजित केला होता. या विद्यार्थ्यांनी शाळेस २५ सिलिंग फॅन भेट दिले आहेत. या कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजनाने करण्यात आली. तालुक्यात प्रथमच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी आयोजित केलेला हा पहिला माजी शिक्षक व विद्यार्थी मेळावा असल्याचे या माजी विद्यार्थ्यांनी सांगितले. २९ वर्षापूर्वी पहिलीच्या वर्गात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी हा योगायोग जुळवून आणला. यावेळी विद्यार्थी व शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी जुन्या आठवणींना उजाळा देत, हास्यविनोदात विद्यार्थी व शिक्षक रमले होते.

या कार्यक्रमासाठी शिक्षण विस्तार अधिकारी भास्कर बेशकराव, सुभाष चव्हाण, मुख्याध्यापक मधुकर रोडगे, माजी मुख्याध्यापक दिनकर कुलकर्णी, सेवानिवृत्त शिक्षक शरणाप्पा जट्टे, तसेच आजी माजी शिक्षक एस.एम. शेख, माळी सर, कांबळे मॅडम, बी. डी. बादुले, घोडके सर, माळी मॅडम, पी एम बडूरे, डी एम फावडे, संजय संदिकर, मोहन शेवाळे, प्रशांत लांडगे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष के. डी. पाटील यांच्यासह विद्यार्थी पांडुरंग घोडके, हरी पवार, शाम नारायणकर, वसीम पठाण, शकुर पठाण, जावेद शेख, अशोक हंचाटे, यांच्यासह माजी विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते. प्रास्ताविक सुरज शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशरोद्दीन शेख यांनी तर शिक्षक सुरेश साळुंके यांनी आभार मानले.

माजी विद्यार्थ्यांच्या भावना
आताच्या काळात माजी विद्यार्थी केवळ शाळेला भेट देऊन जुन्या आठवणीच जागवत नाहीत तर शाळेला आवश्यक असलेल्या गरजेच्या वस्तूही देतात. जिल्हयात गेल्या काही महिन्यांमध्ये झालेल्या कार्यक्रमांमध्ये माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या रंगरंगोटी तसेच फरशी काम व डेस्क बदलण्यासाठीही निधी उपलब्ध करून दिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...