आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आलूर:आलूर सोसायटी चेअरमन; व्हाइस चेअरमन बिनविरोध

विजय20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उमरगा तालुक्यातील आलूर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन व व्हाइस चेअरमन पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली. मंगळवारी (दि. ७) पार पडलेल्या बैठकीत चेअरमनपदी संगप्पा ब्याळीकुळे तर व्हाइस चेअरमनपदी आझाद मिर्जा यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

आलूर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाली होती. मंगळवारी (दि. ७) निवडणूक अधिकारी आर व्ही लोमटे यांच्या अध्यक्षतेखाली चेअरमन व व्हाइस चेअरमन निवडीसाठी बैठक आयोजित करण्यात आली होती.यात चेअरमनपदासाठी संगप्पा ब्याळीकुळे व व्हाइस चेअरमन आझाद मिर्जा या दोघांचाच अर्ज आल्याने या दोघांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.निवडीनंतर नूतन चेअरमन, व्हाइस चेअरमन तसेच संचालकांचा सत्कार करण्यात आला.

या वेळी माजी सदस्य गुलाब राठोड, नागेश पाटील, उल्हास गुरगुरे, राजकुमार माने, उपसरपंच प्रकाश वाकडे, जितेंद्र पोतदार, नागणा ब्याळीकुळे, लक्ष्मण मुनाळे, संतोष भाकरे ,माजी सरपंच भालचंद्र कांबळे, धनराज स्वामी,सिध्यप्पा ब्याळीकुळे, सतीश वाकडे, सिराज अत्तार, राजेंद्र बिऱ्हाडे, अमृत गुरव, अनिल मरबे, दिलीप बिऱ्हाडे, योगीराज स्वामी, आनंद बोळदे,धर्मना मुनाळे, श्रीकांत बिराडे आदींसह सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र पोतदार यांनी केले. राजकुमार माने यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...