आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभूम तालुक्यातील पाथरूड प्राथमिक केंद्रावर वडाचीवाडी, उमाचीवाडी, बागलवाडी, नान्नजवाडी, जयवंतनगर सह वीस गावचा चार्ज आहे. त्यामुळे आरोग्य केंद्रामध्ये नेहमी वर्दळ असते. डिलिव्हरीचे पेशंट व इतर सिरीयस पेशंट नेण्यासाठी व घेऊन जाण्यासाठीएक रुग्णवाहिका होती. परंतु जास्त गावचा चार्ज असल्यामुळे ती कमी पडत होती. त्यामुळे दुसरी एक रुग्णवाहिका उपलब्ध होण्यासाठी बऱ्याच दिवसापासून पालकमंत्री तथा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता. त्या पाठपुराव्याला यश येऊन येऊन रुग्णवाहिकाचा लोकार्पण सोहळा प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये झाला.
पाथरूड आरोग्य केंद्र केंद्राला स्वच्छता आरोग्य केंद्रातील योग्य नियोजन रेकॉर्ड इत्यादी बाबतीत प्रतिष्ठेचा समजला जाणारा कायाकल्प हा पुरस्कार नुकताच प्राप्त झाला आहे. त्यामध्ये दुसरी रुग्णवाहिका मिळून भर पडली आहे आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून मिळालेल्या रुग्णवाहिकाच्या लोकार्पण कार्यक्रमास वैद्यकीय अधिकारी महेश गिरी युवासेनेचे जिल्हाप्रमुख तथा रुग्णकल्याण समितीचेे सदस्य डॉ.चेतन बोराडे, शिवाजी तिकटे डॉ.श्वेता गायकवाड ,समूह वैद्यकीय अधिकारी गणेश नागरगोजे,ऋषी पवार,परिचारिका बागडे घुगे,पाटील,इंगळे मडके,लेकुरवाळे,धावारे, े,रुग्णवाहिकेचे चालक शिवाजी अडसूळ कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.