आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव; पालिकेकडून रॅली, रांगोळी स्पर्धेसह विविध कार्यक्रम

नळदुर्ग3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेले “हर घर तिरंगा” हे अभियान नळदुर्ग शहरात १०० टक्के यशस्वी व्हावे, यासाठी शहरवासीयांनी सहकार्य करावे, असे आवाहन न.प.चे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांनी नळदुर्ग नगरपालिकेत ५ ऑगस्ट रोजी आयोजित बैठकीत बोलताना केले केले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित केलेले “हर घर तिरंगा” हे अभियान नळदुर्ग शहरात यशस्वी व्हावे, यासाठी नगरपालिकेने जय्यत तयारी सुरू केली आहे. नगरपालिकेचे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांनी या अभियानात शहरांतील सर्व घटकातील नागरिकांना सामावून घेण्याचा एक चांगला प्रयत्न केला आहे. या अभियानासंदर्भात मुख्याधिकारी कुंभार यांनी लोकप्रतिनिधी, शहरांतील सर्व पक्षांचे पदाधिकारी, पत्रकार, व्यापारी, शहरांतील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शहरांतील सर्व महिला बचत गटांचे पदाधिकारी व सदस्यांसोबत स्वतंत्र बैठका घेऊन “हर घर तिरंगा” या राष्ट्रीय अभियानात सर्वांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला आहे. शहरातील प्रत्येक घर, दुकान तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयावर १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत राष्ट्रीय तिरंगा ध्वज फडकवला जावा, यासाठी नगरपालिका प्रयत्न करीत आहे.

यासंदर्भात ५ ऑगस्ट रोजी न.प.कार्यालयात पत्रकार तसेच लोकप्रतिनिधींची स्वतंत्र बैठक घेतली. यावेळी माजी नगरसेवक नयरपाशा जागीरदार, शहेबाज काजी, उदय जगदाळे, नितीन कासार, कमलाकर चव्हाण, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नवाज काजी, भाजपचे शहराध्यक्ष धिमाजी घुगे, मनसेचे शहराध्यक्ष अलीम शेख, आम आदमी पार्टीचे वसीम पठाण, लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गायकवाड, माजी नगरसेवक सुधीर हजारे, सरदार सिंग ठाकूर, ज्योतिबा येडगे, प्रमोद कुलकर्णी, जिलानी कुरेशी, अजहर शेख, सुनील बनसोडे, कल्पना गायकवाड यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगरपालिकेच्या वतीने हर घर तिरंगा हे अभियान यशस्वी होण्यासाठी ८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला बचत गटाच्या पदाधिकारी, सदस्य, लोकप्रतिनिधी, पत्रकार तसेच नागरिकांची संपूर्ण शहरांतून रॅली काढण्यात येणार आहे.

बचत गटांसाठी रांगोळी स्पर्धा
१२ ऑगस्ट रोजी शहरांतील सर्व महिला बचत गटांसाठी रांगोळी स्पर्धा होणार आहे. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान शहरातील प्रत्येक घरासमोर “तिरंगा” रांगोळी काढावी, यासाठी नगरपालिका महिला बचत गटांच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे. “हर घर तिरंगा”हे अभियान नळदुर्ग शहरात १०० टक्के यशस्वी व्हावे, यासाठी शहरातील प्रत्येक नागरिकांनी नगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...