आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंच्याहत्तरावा अमृतमहोत्सव ठिकठिकाणी उत्साहात साजरा:येणेगूर येथे अमृतमहोत्सव

येणेगूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उमरगा तालुक्यातील येणेगूर येथे स्वातंत्र्याचा पंच्याहत्तरावा अमृतमहोत्सव ठिकठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला. येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच सुनंदा माळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपसरपंच राहुल बनसोडे, वैभव बिराजदार, दिलीप येडगे,अमोलकुमार स्वामी, महादेव बिराजदार, ग्रामविस्तार अधिकारी शरद बलसुरे उपस्थित होते.

येथील जिल्हा परिषद प्राथमिक शळेत मुख्याध्यापक चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी सुनिल मेंगशेट्टी, लक्षमण कवठे,शिवाजी मोरे,संदीप अंबुसे,सौ उषा गाडे,श्रीदेवी लामजणे आदिंसह सर्व शिक्षक विद्यार्थी पालक उपस्थित होते. येथील हायटेक इंग्लिश स्कुल येथे मुख्याध्यापक सरस्वती मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी प्रकाश कंटेकुरे, ईरप्पा मंडले, संध्या सागर, माधुरी चेंडके,जरीन शेख,अलका हिंगमिरे आदिंसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक उपस्थित होते. येथील पशुवैद्यक दवाखान्यात पो हे कॉ मिलिंद साकळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी श्रीकांत कदम,पो. हे. कॉ यशवंत सगर,भिमराव समुद्रे, सुशांत मसाळ यांच्यासह होमगार्ड उपस्थित होते. तसेच नवीन झालेल्या मॉडर्न इंग्लिश स्कुल मध्येही मान्यवर व विद्यार्थंच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आलेप्राथमिक आरोग्य केंद्र येणेगूर येथे वैद्यकीय अधिकारी डॉ सुहास साळुंके यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी विजय धामशेट्टी,नर्स आशा कार्यकर्त्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

कॅप्टन जोशी विद्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण झाले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून परमहंस शिक्षण संस्थेचे सचिव बाबुराव बिराजदार,अध्यक्ष देवराज बिराजदार प्रशालेचे मुख्याध्यापक महेश हरके, लोककल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्था कोराळ अध्यक्ष विक्रम दासमे अरुणकुमार जोशी, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व ध्वजारोहण परमहंस शिक्षण संस्थेचे सचिव बाबूराव बिराजदार यांच्या हस्ते झाले. कोराळ येथील संस्थेने इयत्ता दहावी व बारावीत प्रथम द्वितीय व तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांचे सत्कार केले. कु. श्रद्धा सोनकटाळे हिने एन.एम. एम. एस. या परीक्षेत यश संपादन केल्यामुळे तिचा सत्कार करण्यात आला. गावात प्रभातफेरीही काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या महापुरुषांच्या वेशभूषेत येऊन या कार्यक्रमाचे लक्ष वेधले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन गोपाळ गेडाम यांनी केले.या कार्यक्रमासाठी शिक्षक व्यंकट बिराजदार, महेश खंडाळकर, चंद्रकांत बिराजदार,प्रवीण स्वामी, माहदेव बिराजदार, सुरेश जाधव,प्रदीप शिंदे, गणेश जोजन, सिद्रामप्पा मुदकण्णा,श्रीमती कोमल कीर्तने,सौ पार्वती जगताप, कालिंदी भाले उपस्थित होते.कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना प्रशालेतर्फे खाऊ वाटप करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...