आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:महागाईच्या विरोधात आगडोंब उसळला असून याच्या विरोधात युवासेनेच्या वतीने थाळ्या वाजवून आंदोलन

उस्मानाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महागाईच्या विरोधात युवासेनेने वाजवल्या थाळ्या

महागाई विरोधात युवासेनेचे राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील हंबीरे पेट्रोल पंप येथे युवासेनेने थाळीनाद आंदोलन केले. केंद्र सरकारने सत्तेवर येण्या अगोदर जनतेला महागाई कमी करण्यासंदर्भात मोठमोठी आश्वासने दिली होती. परंतु, सद्य स्थितीत केंद्र सरकारला याचा विसर पडलेला आहे. ज्या पद्धतीने कोरोना पळवून लावण्यासाठी थाळी वाजवण्याचा चा कयास लावला होता.

त्याप्रमाणे थाळी वाजवल्या नंतर तरी कमी पंतप्रधान नरेंद्र मोदी महागाई पळवून लावण्याची सद्बुद्धी लाभावी यासाठी व केंद्र सरकारने वाढविलेल्या महागाईचे अभिनंदन करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले, असल्याचे यावेळी सांगण्यात आले. आंदोलनात युवासेना जिल्हाप्रमुख अक्षय ढोबळे, विभागीय सचिव जिल्हासमन्वयक तथा सरपंच अॅड. संजय भोरे, उपजिल्हाप्रमुख विजय राठोड, काँलेज कक्ष प्रमुख अजय धोंगडे, जगताप, युवासेना तालुका प्रमुख वैभव वीर, शहर प्रमुख रवि वाघमारे, तालुका संघटक व्यंकट कोळी, विधानसभा प्रमुख पांडुरंग माने, सचिव गुरुनाथ गवळी, शिवसेना सोशल मीडिया जिल्हा समन्वयक राज जाधव, उपशहर प्रमुख मनोज उंबरे, अभी कदम, दिनेश बंडगर, अरुण राठोड, संदीप बनसोडे, निखिल धोडके, ओंकार आगळे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...