आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रशस्त पार्किंग,विस्तारित रस्ते, ना वाहतुकीची कोंडी ना प्रदूषणाचा त्रास. स्वच्छ पिण्याच्या पाण्यासोबत जागोजागी स्वच्छतागृह. मंदिरात सुलभ दर्शन, शांत बैठकीची सोय. दर्शनानंतर २० हेक्टरवर साकारलेले भव्य कॉरिडॉर, त्यात देवतांच्या भव्य १९० प्रतिकृती, भिंतींवरील विविध लक्षवेधी प्रसंग, पौराणिक माहिती..हे आहे तीर्थक्षेत्र उज्जैन येथील महाकाल मंदिर परिसराचे चित्र. अगदी याच धर्तीवर तीर्थक्षेत्र तुळजापुरचाही विकास साधता येऊ शकतो. २००७ मध्ये तुळजापूरसाठी ३२५ कोटींचा विकास आराखडा राबविण्यात आला. ही रक्कम खर्चही झाली. मात्र, धर्मशाळेच्या इमारतीव्यतिरिक्त विकास दिसून येत नाही. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये तुळजापूरच्या प्रचारसभेत तुळजापूरचा विकास करण्याचा शब्द दिला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंदिराच्या विकासासाठी निधी देण्याची घोषणा केली आहे.
उज्जैनमध्ये विकास, तुळजापूरला आस । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालावे उज्जैन एक प्रसिद्ध ज्योतिर्लिंग असून, प्राचीन मंदिरात भगवान महाकाल यांचा निवास आहे. उज्जैनच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने प्रयत्नांची फलश्रुती झाली. तुळजाभवानी मातेचे देशभरात भक्त आहेत. तसेच मंदिराला पौराणिक इतिहास लाभला आहे. छत्रपती शिवरायांचे प्रेरणास्थान असलेले मातेचे मंदिर व नगरीच्या विकासाची मागणी होत आहे.
दिव्य मराठी एक्स्प्लेनर
कृष्णमुरारी शर्मा,
मुख्य आर्किटेक्ट, उज्जैन कॉरिडॉर
उज्जैनमध्ये भाविक संख्येत १० पटीने वाढ, रोजगार वृद्धी
उज्जैनमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी उत्तम दर्शन व्यवस्था निर्माण करतानाच त्यांना मुबलक सुविधा मिळाव्यात, यासाठी आम्ही प्रयत्न केले. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आलेत. कॉरिडॉरमुळे भाविकांची सरासरी दैनंदिन संख्या दीड ते दोन लाखांवर गेली. आधीचे भाविकांचे सरासरी प्रमाण १८ हजार होते. म्हणजे आता संख्येत तब्बल दहापटींनी वाढ झाली आहे. त्यामुळे रोजगारात वाढ झाली आहे.
तुळजापूरलाही रामदरा प्रकल्पाभोवती मंदिर संस्थानची २५ एकर जमीन दळणवळण आणि साम्य उज्जैनपासून अवघ्या 50 किमीवर असलेल्या इंदूरमध्ये नियमित विमानसेवा तुळजापूरपासून 50 किमी सोलापूर शहरात विमानतळाची सुविधा उपलब्ध आहे. उज्जैनमध्ये रेल्वेसेवा असून फक्त मध्य प्रदेश नव्हे तर देशभरातून येणाऱ्या भाविकांची सोय होते. तुळजापूरपासून २० किमी उस्मानाबाद आहे. सोलापूर-तुळजापूर रेल्वेमार्गाचे काम सुरू होत आहे.
अन्य धार्मिक स्थळांचाही अभ्यास
तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करण्यासाठी मंदिर संस्थानने एजन्सी नेमली. ३ महिन्यात विकास आराखडा सादर करेल. यात मंदिराच्या सभोवताल विकास, पर्यटन प्रकल्पांचा समावेश असेल. उज्जैन व काशी वाराणसीचा अभ्यास करणार. पंढरपूर कॉरिडॉर संदर्भातील माहिती घेतली आहे.
आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू, लवकर विकास करणार
^२०१९ मध्ये गृहमंत्री अमित शहा यांनी वैश्विक दर्जाचे धार्मिक पर्यटन स्थळ विकसित करण्याचा शब्द दिला. शिंदे-फडणवीस सरकारने तुळजापूर, पंढरपूरच्या विकासाला प्राधान्याने मान्यता दिली.आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नागरिकांना विश्वासात घेऊन विकास करू.
राणा जगजितसिंह पाटील,
आमदार, तुळजापूर.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.