आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:सेवाभावातून सामाजिक न्याय जपण्याचे आवाहन; डॉ. बापूजी साळुंके व्याख्यानमालेत उमाकांत मिटकर

उस्मानाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी समाजातील उपेक्षित -वंचित घटकात जाऊन सेवा भावातून सामाजिक न्याय जपावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते उमाकांत मिटकर यांनी डॉ. बापूजी साळुंखे व्याख्यानमालेत केले. यावेळी डॉ.बापूजी साळुंखे विधी महाविद्यालय व वात्सल्य सामाजिक संस्था यांच्यात सामंजस्य करार संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.व्ही.जी.शिंदे तर प्रमुख पाहुणे म्हणून वात्सल्य सामाजिक संस्थेचे उमाकांत मिटकर होते.

यावेळी मिटकर यांची ‘सामाजिक न्याय व सेवाभाव’ या विषयावर मांडणी झाली.ते म्हणाले की, सामाजिक क्षेत्रात असंख्य अडचणी, प्रश्न आहेत,शासकीय स्तरावर त्या सोडवण्यासाठी मर्यादा येतात.अशावेळी लॅा चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे प्रश्न समजून घेऊन ते सोडविण्यासाठी प्रयत्नरत रहावे. मिटकर यांनी त्यांच्या सामाजिक कामात आलेले अनेक अनुभव निवेदन करून विद्यार्थ्यांना प्रश्नांची जाण निर्माण करून दिली.

डॉ.बापूजी साळुंखे विधी महाविद्यालय व वात्सल्य सामाजिक संस्थेमध्ये पुढील पाच वर्षासाठी सामाजिक विषयावर काम करण्यासाठी सामंजस्य करार झाला.याप्रसंगी विद्यार्थी-विद्यार्थिनींची उपस्थीती होती. तसेच शिवछत्रपती पुरस्कार विजेतेशाहूराज खोगरे,डी.न्यूजचे संपादक लक्ष्मण दुपारगुडे,प्रा.बारकुल,प्रा.मडके,प्रा.शाह,डॉ.गोलवाल, डॅा.स्मिता कोल्हे,प्रा.चंदनी घोगरे,प्रा.महिंद्रकर,प्रा.अजित शिंदे,श्री.बागल व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.नितीन कुंभार तर आभार प्रदर्शन प्रा.संजय आंबेकर यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

बातम्या आणखी आहेत...