आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजागतिक पातळीवर बदलत्या माहिती व तंत्रज्ञान धोरणाबरोबरच अर्थव्यवस्था अन समाजव्यवस्थेमधील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी बारावी झाल्यानंतर महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी उच्चशिक्षण अभ्यासक्रमाच्या माध्यमातून करिअर घडवण्यासाठी संधीचा शोधावी, ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन उपप्राचार्य प्रा. डॉ. संजय अस्वले यांनी केले.
शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दीक्षारंभ योजनेंतर्गत महाविद्यालयात उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी दुसऱ्या सत्रात फ्रेशर्स पार्टी आणि विद्यार्थ्यांच स्वागत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी प्रा डॉ. अस्वले बोलत होते. या कार्यक्रमांतर्गत प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमाची तोंड ओळख व्हावी, महाविद्यालयातील उपलब्ध संसाधनाची माहिती तर महाविद्यालयातील वरिष्ठ विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन मिळावे याचे नियोजन मंगळवारी (१०) करण्यात आले होते. वाणिज्य मंडळ अंतर्गत क्वॉलिटी सर्कलच्या बी कॉम द्वितीय आणि तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन उपप्राचार्य डॉ. अस्वले यांनी केले.
या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्यासाठी असे उपक्रम राबवणे आवश्यक असल्याचे डॉ अस्वले यांनी सांगितले. यावेळी वाणिज्य मंडळ सल्लागार डॉ केशव लेंगरे, अध्यक्ष डॉ अजित आष्टे, सचिव प्रवीण कटके, सहसचिव प्राजक्ता बलसुरे, जिजाऊ रोटरॅक्ट क्लब अध्यक्षा वैष्णवी जगताप, पल्लवी दामवाले,बबीता जगताप मनीषा बिराजदार, पवन पाटील आदींनी पुढाकार घेतला. ऋतिका शेळके हिने सूत्रसंचलन केले.पल्लवी जगताप हिने प्रास्ताविक केले. कार्यक्रमासाठी प्राजक्ता बलसुरे, प्रवीण कटके, पल्लवी दामवाले, संध्याराणी भोसले, प्रथमेश पांगे, बबिता जगताप, मनीषा बिराजदार,विजय वाडीकर आदींनी मनोगत व्यक्त केले. अंकिता कुलकर्णी हिने आभार मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.