आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपहरणाचा प्रयत्न:उमरग्यात मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न फसला

उमरगा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सात वर्षीय मुलाने दाखविलेल्या सतर्कतेमुळे बुधवारी (दि.३०) सायंकाळी अपहरणाचा प्रयत्न फसला. शहरातील दिवंगत माजी मंत्री खालिकमिया काझी यांचे पुतणे मौजम (मन्नू) काझी यांचा सात वर्षीय मुलगा हामजा घराबाहेर रोडवर थांबला असता दुचाकीवरून आलेल्या एकाने त्याच्या अपहरणाचा प्रयत्न केला. मुलाने त्याच्यापासून सुटका करुन घेत घराकडे पळ काढला.

वडिलांना माहिती दिली. वडिलांनी पोलिसांना माहिती देताच पोलिस घटनास्थळी पोहचले. प्रा. रवींद्र गायकवाड यांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज किरण गायकवाड यांनी तपासले असता स्कूटीवर आलेला एकजण दिसत आहे. मात्र रस्त्याच्या कडेने स्कूटी गेल्याने अंदाज बांधता आला नाही. पोलिसांनी या मार्गावरील अन्य सीसीटिव्ही फुटेजचा शोध सुरू केला.

बातम्या आणखी आहेत...