आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:पोलिसांच्या रात्र गस्तीमुळे डिझेल चोरीचा प्रयत्न फसला

उस्मानाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तामलवाडी पोलिस ठाण्याचे पथक ५ ऑगस्टला पहाटे चार वाजेच्या सुमारास माळुंब्रा शिवारातील महामार्गावर गस्तीवर असताना ढाब्याजवळ उभ्या ट्रकजवळ तीन पुरुष उभे असल्याचे दिसले. पोलिस तिकडे जाताच ते अंधारात पसारत झाले. त्या ट्रकच्या बाजुला एक सुमो कार (क्र. एमएच. २४, सी ८७३१) बेवारस असून त्या ट्रकच्या इंधन टाकीचे कुलूप तोडून त्यातील डिझेल नळीद्वारे काढून प्लास्टीक कॅनमध्ये भरुन चोरी केली जात असल्याचे पोलिसांना समजले.

पोलिसांनी त्या ट्रक चालकास झोपेतून उठवून घडल्या प्रकाराची माहितीदिली. पोलिसांनी घटनास्थळावरील डिझेलसह कॅन, नळी व सुमो वाहन जप्त केले असून त्या वाहनाची मालकी शोधून पोलिस तपासाची दिशा ठरवत आहेत. याप्रकरणी ट्रकचालक उदय गंगाराम (रा. उत्तर प्रदेश) यांच्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

बातम्या आणखी आहेत...