आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांनी शनिवारी (दि.४) शाळेतील उपक्रमांतर्गत आनंद बाजार भरवला. यात विद्यार्थ्यांनी ५० स्टॉल उभारले. खवय्यांनी विद्यार्थ्यांच्या स्टॉलला भेट देत खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. जुनेद मोमिन, मुख्याध्यापक तय्यबअली शहा यांच्या हस्ते आनंद बाजाराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष मोहियोद्दीन शेख, उपाध्यक्ष मुख्तार अहेमद काझी, शेख मुजीब शेख, इर्शाद मुलाणी यांची उपस्थिती होती.
निरीक्षक म्हणून सय्यद शबनम आपी (उस्मानाबाद), अजहर पटेल (बेंबळी), मुफस्सिल इनामदार पंडित (भूम), शाफिया, जि. प. उर्दू शाळा (अंबेहोळ) हे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक तय्यबअली महेबूब शहा, विभागप्रमुख अर्शिया शेख, कलीम मोमीन, मुहंमद इक्बाल अली, फुलमामडी तौफीकुल आलम, शमशुद्दीन चौधरी, अब्दुल वहीद शेख, मौला शेख, जीनत सुलताना सय्यद, फरहत सुलताना मोमीन, अन्सारी इख़लास, रेश्मा शहा आदी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन मौला शेख यांनी केले तर आभार तौफिकुल आलम फुलमामडी यांनी मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.