आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने राज्यात सर्वप्रथम विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचे राज्यभर स्वागत झाले, राज्य सरकारनेही या ठरावाचे शासन निर्णयात रुपांतर केले. उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील आंद्रुड ग्रामपंचायतीने सुद्धा विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव घेऊन पुरोगामी पाऊल टाकले आहे.
वटपौर्णिमेच्या शुभदिनी हा निर्णय जाहीर करण्यात आला. सरपंच वर्षा गीते व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी याबाबत एकमताने ठराव घेतला. विधवा प्रथेमुळे महिलांचे व्यक्तिस्वातंत्र हिरावल्या जाते, हा धागा पकडून वैशालीताई मोटे यांनीही शासनाकडे पाठपुरावा केला होता. हा निर्णय व ठरावामुळे समाजातील अनिष्ट प्रथेस पायबंद घातला जाऊन विधवा महिलांना सन्मानाने जगण्याचा मार्ग प्रशस्त होण्याची आशा आहे.
आंद्रुड ग्रामपंचायतीने ठरावात म्हटले आहे की, पतीच्या निधनानंतर पत्नीच्या कपाळाचे कुंकू पुसणे, मंगळसुत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातील जोडवे काढणे, त्यांना धार्मिक कार्यक्रमात सहभागी होता न येणे, ही अनिष्ठ प्रथा आहे. या प्रथेमुळे व्यक्तीच्या सन्मानाने जगण्याच्या अधिकारावर गदा येते. आपल्या गावात विधवा महिलांना सन्मानाने जगता आले पाहिजे, यासाठी आंद्रुड येथे विधवा प्रथा बंद करण्यात येत आहे.’
महिलांना सन्मानाने जगण्याचा अधिकार
महिलांचे व्यक्तिस्वातंत्र्य हिरावून घेणाऱ्या अनिष्ठ प्रथा सुरू आहेत. लोकशाहीत प्रत्येक व्यक्तीस सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. पतीच्या निधनानंतर महिलेवर दुःखाचा डोंगर कोसळला असताना कुंकू पुसणे, बांगड्या फोडणे, मंगळसुत्र तोडणे आदीने तिला आणखी वेदना होतात. त्यामुळे ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव घेतला. -वर्षा ज्ञानेश्वर गीते, सरपंच, आंद्रुड.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.