आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार‎:अंगणवाडी सेविका कल्पना‎ राठोड यांना आदर्श नारी‎ जीवन गौरव पुरस्कार‎

नळदुर्ग14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर तालुक्यातील‎ खुदावाडीच्या पाटील तांडा येथील‎ अंगणवाडी सेविका कल्पना राठोड‎ यांना संत तुकाराम सामाजिक संस्था‎ बाभळगाव यांच्यावतीने जिल्हास्तरीय‎ आदर्श नारी जीवन गौरव पुरस्काराने‎ सन्मानित करण्यात आले.

जागतिक‎ महिला दिनाचे औचित्य साधून‎ बाभळगाव येथील संत तुकाराम‎ सामाजिक संस्थेच्या वतीने इटकळ‎ येथील विवांता रिसाॅर्ट येथे विविध‎ क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या‎ महिलांचा जिल्हास्तरीय आदर्श नारी‎ जीवन गौरव पुरस्कार वितरण‎ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले‎ होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी‎ आधुनिक लहुजी सेनेच्या महाराष्ट्र‎ राज्याच्या अध्यक्षा नगीनाताई कांबळे‎ तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा क्षयरोग‎ अधिकारी डॉ रफीक अन्सारी, नायब‎ तहसीलदार चंद्रकांत शिंदे,‎ विजयकुमार माने यांच्यासह इतर‎ मान्यवर उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...