आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संताप:संतप्त ग्रामस्थांचा  दोन तास रस्तारोको ; रस्त्याच्या कामास सरकारने स्थगिती दिली

कळंब3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हासेगाव, ईटकुर, पारा हा रस्ता हा मृत्यूचा सापळा झाला आहे. या रस्त्याकरिता १ कोटी ३० लाख रुपये मंजूर झालेले असून सुध्दा या रस्त्याच्या कामास सरकारने स्थगिती दिली आहे. ही स्थगिती उठवून रस्त्याचे काम चालू करण्यात यावे या मागणी करीता इटकूर येथे शिवसेना (ठाकरे गट) व सात गावच्या संतापलेल्या ग्रामस्थांनी तब्बल दोन तास रास्तारोको केला.

तालुक्यातील हासेगाव, ईटकुर, पारा, प्रजिमा १५ हा रस्ता कळंब व वाशी या दोन तालुक्याच्या ठिकाणाला जोडला गेलेला असल्यामुळे वाहनांची वर्दळ मोठया प्रमाणात आहे. दळणवळण करीता रस्ता महत्त्वाचा आहे. या रस्त्यावर १ कोटी ३० लाख रुपये सन २०२१-२२ मध्ये मंजूर झाले होते. आता रस्त्याचा प्रश्न मिटणार असे सर्वांना वाटत होते. मात्र रस्त्याचे कामास सरकारने स्थगिती दिलेली आहे. यामुळे रस्त्याच्या कामाची पुढील कार्यवाही थांबली आहे. या रस्त्यावरील ग्रामस्थांनी या रस्त्याचे काम चालू करण्यात यावे अशी मागणी केली होती. मात्र बांधकाम विभागाने कुठल्याही प्रकारची हालचाल केली नाही.

रस्त्याचे काम तात्काळ चालू न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेच्या (ठाकरे गट) वतीने देण्यात आला होता. दिनांक २३ नोव्हेंबर २०२२ रोजी १० वाजता इटकूर येथील बसस्थानक समोर दोन तास रस्ता रोको करण्यात आला. तद्नंतर मंडळ अधिकारी तुळशीदास मटके यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेना (ठाकरे गट) उपतालुकाप्रमुख भारत सांगळे, लक्ष्मण अडसूळ , विभाग प्रमुख दत्ता सावंत, बाळासाहेब गंभीरे, प्रा. दिलीप पाटील, मालोजी पाटील, हिंदू आबा बावळे, रामचंद्र चोरघडे, पोपट आडसूळ ,बबलू अडसूळ, अशोक आडसूळ, विजू दादा माने आदी शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

दरवर्षी पॅचवर्क करून कंत्राटदारास जगविण्याचा प्रकार हा रस्ता मृत्यू चा सापळा झाला आहे. असे असतानाही या रस्त्याच्या कामाला स्थगिती देण्यात आली आहे. सदरील मंजुर कामास स्थगिती देऊन सामान्य माणसाच्या जिवीताशी खेळणाऱ्या शासनावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.मौजे ईटकुर याठिकाणी मौजे हासेगाव, वाकडी, हावरगाव, कोठाळवाडी, ईटकुर, गंभीरवाडी, बोरगाव या गावातील संतप्त ग्रामस्थांनी अंादोलनात सहभाग नोंदविला.विशेष म्हणजे बांधकाम विभाग यांच्या अंतर्गत हा रस्ता येतो. या रस्त्यावर प्रतिवर्षी पॅचवर्कचे काम करुन लाखो रुपयांचा खर्च करण्यात येतो. काही दिवसात जैसे थे परिस्थिती निर्माण होते. वारंवार फक्त पॅचवर्कचे काम काढुन फक्त गुत्तेदार जगवण्याचे काम चालू आहे काय असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही.

बातम्या आणखी आहेत...