आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्साह:अण्णा भाऊ साठे यांची जयंती सांगता मिरवणूक उत्साहात ; बॅन्जो आणि डीजेच्या तालावर नृत्य

टेंभुर्णी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

टेंभुर्णी येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीची सांगता शनिवारी (दि. २७) मिरवणुकीने उत्साहात झाली. या वेळी शहर परिसरातील हजारो युवकांनी हालगी, बॅन्जो आणि डीजेच्या तालावर नृत्य केले.साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याचे पूजन आमदार बबनराव शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ग्रामपंचायत कार्यालयासमोरून अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याची मिरवणूक काढली. शहरातून हलगी, बँजो, डॉल्बीच्या गजरात शहरातील प्रमुख मार्गांवरून मिरवणूक निघाली. या वेळी आबाल वृद्धांनी डॉल्बीच्या तालावर ठेका धरला होता.

या वेळी सरपंच प्रमोद कुटे, काँग्रेस कमिटीचे माढा तालुका प्रभारी ऋषिकेश बोबडे, सिद्राम आरडे, काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष रामभाऊ वाघमारे, माजी सरपंच अनिल जगताप, जयवंत पोळ, बहुजन संघर्ष समितीचे नागनाथ वाघमारे, सतीश जगताप, अनिल यशवंत जगताप, रोहित आरडे, राहुल आरडे, सुनील जगताप आदी उपस्थित होते. सनी जगताप, शुभम जगताप, पवन जाधव, धनराज वाघमारे, नागेश जगताप यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...