आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालहूजी विद्रोही सेनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात आमदार राणाजगजितसिंह पाटिल यांच्या शुभहस्ते व भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे, यांच्या उपस्थितीत अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
प्रसंगी साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांना मरणोपरांत भारतत्न देण्यात यावा, मुंबई विद्यापीठाला अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे व अण्णाभाऊंची जन्मभुमी व कर्मभूमी असलेल्या सांगली जिल्ह्याला अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे, अशा प्रमुख मागण्या लहूजी विद्रोही सेनेच्या संस्थापक सचिव ॲड पूजाताई देडे यांच्या वतीने करण्यात आल्या व त्यासाठी लहूजी विद्रोही सेनेच्या वतीने ठोस पावले उचलली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रसंगी संघटनेच्या संस्थापक सचिव तथा भाजपा यूवती मोर्चाच्या मराठवाडा उपाध्यक्षा ॲड. पूजाताई देडे, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष राजसिंहराजे निंबाळकर, मिडिया सेलचे अध्यक्ष धनंजय रणदिवे,लहूजी विद्रोही सेना जिल्हाध्यक्ष सोपान उकांडे, तुळजापूर तालुकाध्यक्षा लक्ष्मी भिसे, सामाजिक कार्यकर्त्या नंदाताई पूनगुडे, भाजपा शहराध्यक्ष संदिप इंगळे, देवकन्या गाडे, शहराध्यक्ष प्रल्हाद केंदळे, आकाश खंडागळे, तावजी क्षिरसागर, सहदेव गायकवाड लक्ष्मी डावकरे, नरेन वाघमारे, ओम नाईकवाडी, कल्याण देडे, धनाजी खंडागळे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.