आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयंती:भूम येथे अण्णाभाऊ साठे जयंती

भूम9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यासह शहरात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची १०२ वी जयंती मोठया उत्सहात साजरी करण्यात आली. यावेळी शहरातील साठे नगर, रमाईनगर,लहुजी नगर , कसबापेठेसह शहरात विविध ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी शहरातील सुकानु मध्यवर्ती जयंती उत्सव कमेटीच्या वतीने सोमवार दि १ रोजी अण्णाभाऊ साठेनगर येथे नगरपरिषदचे गट नेते माजी नगराध्यक्ष संजय गाढवे, उपनगराध्यक्षा संयोगिता गाढवे यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करून ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष संजय गाढवे, माजी उपनगराध्यक्षा संयोगिता गाढवे,मेहराज बेगम सय्यद , साई उदयोग समुहाचे दिलीप तेलंग,माजी नगरसेवक सुमित तेलंग, संजय साबळे,अमोल गायकवाड यांच्यासह समाज बांधव मोठया संख्येने उपस्थीत होते.

बातम्या आणखी आहेत...