आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यक्रम:बोरी येथील साईबाबा इच्छापूर्ती मंदिराचा वर्धापन दिन; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

उमरगा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील बोरी मातोळा येथील श्री साईबाबा इच्छापूर्ती मंदिराचा पाचवा वर्धापन दिन सोहळा मंगळवारी, (दि.१०) विविध धार्मिक कार्यक्रमाने हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.

तालुक्यातील बोरी येथे पाच वर्षापूर्वी उभारण्यात आलेल्या श्री साईबाबा इच्छापूर्ती मंदिराचा वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्त दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान मंगळवारी पहाटे पाच वाजता काकड आरती, सकाळी सात वाजता महाभिषेक, नऊ वाजता साई याग, सात ते अकरा साईचरित्राचे पारायण, दुपारी बारा वाजता महाआरती व त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला. तर दुपारी चार ते साडेपाच वाजता भजनी मंडळाचा अभंगवाणी आदी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. सायंकाळी सहा वाजता धुपारती व त्यानंतर गावात प्रमुख मार्गावरून टाळ-मृदंगासह विविध पारंपारिक वाद्याचे गजरात साईबाबा पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली.ओम साई रामच्या जयघोषाने बोरी परिसर दुमदुमुन गेला होता. प्रारंभी पुणे येथील उद्योजक संजय पवळे यांच्या हस्ते पालखी पुजन करण्यात आले. यावेळी शिर्डी येथील कैलाश राजगुरु महाराज, अनिल कदारे, शहाजी वाजळे, मंदीर समितीचे अध्यक्ष रविंद्र इंगळे आदी उपस्थित होते.

या भव्य मिरवणूकीत पुण्यातील प्रतिशिर्डी येथील १०० साई भक्तांसह भाविक सहभागी झाले होते. साई भंडारा वाटपाने सांगता करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी साई मंदिर समीतीचे अध्यक्ष रवी इंगळे अरुण बिराजदार, शरद पाटील, राम इंगळे, जयपाल पाटील, भरत मदने यांनी पुढाकार घेतला.

बातम्या आणखी आहेत...