आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दागिने लुटले:जिल्ह्यात तोतयागिरीतून आणखी एका दाम्पत्याला लुटले

उस्मानाबाद3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात वारंवार विविध शासकीय यंत्रणेतील अधिकारी असून अथवा पोलिस खात्याचे अधिकारी असल्याचे सांगत सोन्याचे दागिने लुटण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. मंगळवारी पुन्हा असाच एक प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार लोहारा तालुक्यातील आष्टाकासार येथील महादेव टिकांबरे मंगळवारी २१ जून रोजी सकाळी पत्नीसह दुचाकीवरून जात होते.

राष्ट्रीय महामार्ग ६५ वरून येणेगूर गावाजवळ आल्यावर मागून दोन इसम दुचाकीवरून आले. त्यांनी आवाज देऊन दाम्पत्याला थांबवले. तसेच आम्ही पोलिस आहोत. अशी खोटी बतावणी करुन रस्त्यावर सोन्याचे दागिने घालून फिरु नका. दागिने काढुन डिकीत ठेवा अशी सुचना टिकांबरे पती- पत्नीस केली. त्यानुसार टिकांबरे यांच्या अंगावरील दागिने डिकीत व्यवस्थित ठेवत असल्याचे भासवले. दागिने ठेवण्याच्या बहाण्याने दोघांच्या नकळत हात सफाईने त्यांचे ५७ ग्रॅम वजनाचे दागिन पळविले.

बातम्या आणखी आहेत...