आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परंपरा‎ कायम‎:अनसुर्डा सोसायटी अध्यक्ष‎ पवार, माने उपाध्यक्षपदी‎

धाराशिव‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अनसुर्डा (ता. धाराशिव) येथील‎ विविध कार्यकारी सेवा सहकारी‎ सोसायटीच्या अध्यक्षपदी नंदकुमार‎ डिगंबर पवार तर उपाध्यक्षपदी भैरू‎ बाजीराव माने यांची बिनविरोध‎ निवड झाली आहे. निवडीनंतर नूतन‎ पदाधिकाऱ्यांसह संचालकांचा‎ सत्कार करण्यात आला.‎ अनसुर्डा विविध कार्यकारी‎ सोसायटीच्या स्थापनेपासून‎ आजवरच्या संचालक मंडळ‎ निवडणुका बिनविरोध झालेल्या‎ आहेत.

यावेळेस देखील गावातील‎ सर्व नेतेमंडळींनी एकत्र येऊन‎ बिनविरोधची ही परंपरा कायम‎ ठेवली आहे. यावेळी नवनिर्वाचित‎ संचालक अरुण माने, नानासाहेब‎ जमदाडे, पांडुरंग दगडू माने, भास्कर‎ बोंदर, पांडुरंग विश्वनाथ माने, पोपट‎ अडसुळे, छत्रपती हुंबे, रामेश्वर‎ पवार, अर्चना माने, शालू माने‎ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...