आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:जिल्ह्यात पाच ठिकाणी अवैध मद्यविरोधी कारवाई; गुन्हे नोंद

उस्मानाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अवैध मद्य विरोधी कारवाई दरम्यान पोलिसांनी १८ जून रोजी अवैध मद्य विरोधी ५ कारवाया करून अवैध मद्य जप्त करत संबंधीत व्यक्तींविरुद्ध संबंधीत पोलिस ठाण्यात ५ गुन्हे नोंदवले आहेत.

उमरगा पोलिसांनी दोन ठिकाणी छापे टकले असता थोरलीवाडी (ता. उमरगा) येथील विलास कोराळे १० लि. हातभट्टी दारु तर उमरगा येथील प्रतीक पाटील २३२ बाटल्या देशी- विदेशी दारु बाळगल्याचे आढळले. मुरुम पोलिसांना भोसगातांडा येथील प्रियंका आडे तांडा परिसरात ७ बाटल्या देशी दारु व १९ लि. हातभट्टी दारु बाळगल्याचे आढळले. नळदुर्ग पोलिसांना रामतीर्थ तांडा येथील प्रेमनाथ राठोड १२ बाटल्या विदेशी दारु बाळगल्याचे आढळले. भूम पोलिसांना सोनगिरी (ता. भूम) येथील आलम हकीम हा गावातील आपल्या पत्रा शेडजवळ ३९ बाटल्या देशी दारू बाळगल्याचे आढळले.

बातम्या आणखी आहेत...