आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हे दाखल:चार ठिकाणी जुगार विरोधी कारवाई

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुगार विरोधी कारवाई दरम्यान उस्मानाबाद पोलिसांनी सोमवारी (दि.५) चार ठिकाणी छापे टाकले. यात जुगार साहित्यासह १६ हजार २०७ रुपयांचा माल जप्त करून संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल केले. कुन्हाळी शिवारात नागप्पा गायकवाड (रा. कोराळी, ता. निलंगा) व आफ्रोज बागवान (रा. शिर्शी, ता. निलंगा) कल्याण मटका जुगार खेळताना आढळले.

कुन्हाळी गावात शिर्शी ग्रामस्थ कमलाकर सांगवे व श्रीमंत कानडे जुगार खेळताना आढळले. खडकी ग्रामस्थ विद्याधर सोनवणे जुगार साहित्यासह सापडले. पांगरदरवाडीत बालाजी क्षीरसागर हे मिलन नाईट जुगार चालवण्याच्या साहित्यासह आढळले.

बातम्या आणखी आहेत...