आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:खरीप पेरणीसाठी घाई न करण्याचे आवाहन; बियाणे खते खरेदी करताना पक्यापावती शिवाय खरेदी करू

पाथरूड8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मौजे जेजला येथे शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीपूर्वी बियाण्याची उगवणक्षमता तपासून घ्यावी . तसेच पेरणीसाठी घाई न करता ७५ ते १०० mm पाऊस झाल्यानंतरच जमिनीत पुरेसा ओलावा पाहून पेरणी करावी असे आवाहन कृषी सहाय्यक पी. एम. चंदनशिवे यांनी केले आहे. तसेच बियाणे खते खरेदी करताना पक्यापावती शिवाय खरेदी करू नका असे आवाहन ही त्यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

पाऊस झालेल्या भागात शेतकरी सोयाबीन , तूर , उडीद , मुग आदी पिकांची पेरणी करीत आहेत , परंतु पाऊस काही भागात पाऊस झाला नाही. यामुळे शेतकऱ्यांनी ७५ ते१०० लिमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी असे आवाहन वारंवार कृषी विभागाच्या वतीने करण्यात आहे.

बातम्या आणखी आहेत...