आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:प्रत्येकाने किमान एक झाड लावण्याचे आवाहन ; जागतिक पर्यावरण दिनी वृक्षारोपण

भूमएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

निरोगी जीवन जगण्यासाठी वृक्ष लागवडीची गरज आहे प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करावे असे आवाहन तालुका सामाजिक वनिकरणचे वनपरिक्षेत्र अधिकारी बी. व्ही. सदानंदे यांनी जागतिक पर्यावरण दिनी वृक्षारोपण करताना केले. रविवार दि. ५ जून रोजी तालुक्यात शासकीय, निमशासकीय कार्यालयात जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला . या निमित्ताने तालुका वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या पुढाकाराने उपविभागीय अधिकारी कार्यालय परिसर ,पंचायत समिती कार्यालय परिसर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या परिसरात जवळपास ६५०० वृक्ष लागवड करण्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे,बी. आर. ढवळशंख, बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर, अमेय पाटील उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...