आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी शेतीला जोडधंदा अथवा सेंद्रिय पध्दतीने शेतीत तुती लागवड करून आर्थिक स्वावलंबन साधण्यासाठी तूती लागवड मोहिम जिल्हाधिकारी कार्यालयाने हाती घेतली आहे. तेव्हा तुतीची लागवड करून शेतकऱ्यांनी याकडे जोडधंदा म्हणून पहावे असे आवाहन जि.प. शिक्षणाधिकारी गजानन सुसर यांनी व्यक्त केले.
जिल्ह्यात दहा हजार एकर क्षेत्रामधे तुती लागवडीचे उद्दिष्ट जिल्ह्यातील ग्रामपंचातीना देण्यात आले आहे. त्या अनुषंगाने बाबळसुर शिक्षणाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयास भेट देवून उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. पुढे बोलताना सुसर असे म्हणाले की,शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजना माहिती करून त्या जाणून घ्याव्यात.आर्थिक स्वावलंबी होण्यासाठी योजनाचा पुरेपूर फायदा घावा. तुती लागवडीसाठी शासनाकडून एक एकरासाठी तीन लाख ४२ हजार रुपये अनुदान स्वरूपात देत आहे. शेतीला जोडधंदा म्हणून जास्तीजास्त शेतकऱ्यांनी योजनांचा लाभ घावा. तसेच फळबाग लागवड सुद्धा मोठ्या प्रमाणात करावी. कधी दुष्काळ तर कधी पाऊस जास्त याप्रमाणे शेतीचे तुटपुंजे उत्पन्न निघते यासाठी तुती व फळबाग लागवड करून हमखास उत्पन्न देणाऱ्या लागवड करावी.
ग्रामसेवक संघटना तालुकाध्यक्ष लक्ष्मण जकेकुरे यांनीही उपस्थित शेतकऱ्यांना तुती आणि फळबाग लागवडीचे महत्व पटवून दिले. यावेळी सरपंच शिवाजी स्वामी, उपसरपंच दादासाहेब सूर्यवंशी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक कमलाकर भोसले, मुख्याध्यापक शाहूराज जाधव,प्रा.निकम,प्रा. रमाकांत पाटील, माजी सरपंच अशोक सुर्यवंशी, अशोक पाटील, नारायण हांडे, दामाजी हांडे,जि.प. शिक्षक, कृषी सहायक, बचतगट, सधन शेतकरी बालाजी सूर्यवंशी, सीआरपी मथरा गायकवाड आदी उपस्थित होते.
या मोहिमंअंतर्गत ग्रामसेवक शरद भुरे, ग्राम रोजगार सेवक दिगंबर हांडे, संगणक परिचालक गणेश सुभेदार, सेवक उद्धव सुर्यवंशी यांनी तुतीचे ५० आणि फळबाग लागवडीचे ५० असे तब्बल १०० प्रस्ताव संकलित करण्याचे काम एका दिवसात केले.शिक्षणाधिकारी यांनी ग्रामस्थ अन ग्रामसेवकच्या कामाचे कौतुक करून जास्तीतजास्त प्रस्ताव करून उद्दिष्ट पूर्ततेचा निर्धार करण्याचे आवाहन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.