आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजाराचे दुरीकरण करण्याचे उद्देश:गोवर रुबेला विशेष लसीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन

उस्मानाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सद्यस्थितीत राज्यात गोवर आजाराचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळून येत आहेत. या आजाराच्या प्रतिबंधा साठी आणि माहे डिसेंबर २०२३ पर्यंत गोवर या आजाराचे दुरीकरण करण्याचे उद्देशाने शासनाच्या मार्गदर्शक सूचना नुसार राज्यात दि. १५ डिसेंबर २०२२ ते २५ डिसेंबर २०२२ पहिला टप्पा आणि दि. १५ जानेवारी २०२३ ते २५ जानेवारी २०२३ या कालावधीत दुसरा टप्पा अशा दोन टप्प्यात गोवर रुबेला विशेष लसीकरण मोहीम आयोजित करण्यात आलेली आहे.

विशेष लसीकरण मोहीम अंतर्गत जिल्ह्यातील नऊ महिने ते पाच वर्ष वयोगटातील लसीकरण न झालेल्या बालकांना प्राधान्याने लसीकरण करण्यात येणार आहे. या साठी लसीकरण न झालेल्या बालकांच्या याद्या मार्फत तयार करण्यात येणार असून लसीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...