आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागर्भलिंग निदान कायद्याची कडक अंमलबजावणी करून मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करून गर्भलिंग निदान करणाऱ्या व्यक्ती विरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश जि.प चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी आज येथे दिले. जिल्ह्यात गर्भलिंग निदानाविरुध्द श्री.गुप्ता यांच्या दालनात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ . धनंजय पाटील, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवकुमार हलगुडे ,माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन बोडके ,विधी सल्लागार ॲड. रेणुका शेटे तसेच सर्व तालुका आरोग्य अधिकारी ,वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी सर्व उप जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, तसेच सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागात काढण्यात येणाऱ्या तपासणी चिट्टीवर, माता बाल संगोपन कार्डवर आणि संस्थेमधून कार्यक्षेत्रामध्ये निर्गमित होणाऱ्या पत्रांवर पी.सी.पी.एन.डी.टी कायद्यांतर्गत खुशखबर योजनेची प्रसिध्दी व जनजागृती करण्याच्या हेतूने व मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढावे यासाठी खुशखबर योजनेच्या शिक्क्याचे वाटप गर्भलिंग निदान करणाऱ्या व्यक्तीची *माहिती देणाऱ्यास एक लाख रुपये बक्षीस* यांच्या शिक्क्याचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. गर्भलिंग निदानाबाबत माहिती देण्या-यास बातमीची खातरजमा करून आणि त्याअनुषंगाने गुन्हा दाखल झाल्यावर बक्षीस देण्याबरोबर माहिती देण्या-याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल,तेंव्हा जिल्हयात कुठेही गर्भलिंग निदान होत असल्यास ग्रामीण रुग्णालय ,उपजिल्हा रुग्णायालय किंवा जिल्हा रुग्णालय येथे माहिती द्यावी, असे आवाहनही श्री.गुप्ता यांनी केले .
नीती आयोगचा हा महत्वाचा निर्देशांक आहे. जिल्ह्यात मुलांच्या तुलनेत मुलींच्या जन्मदरात घट होऊ नये यासाठी आशा वर्कर ,अंगणवाडी कार्यकर्ती यांच्याशी समन्वय साधून गर्भलिंग निदान करणाऱ्या व्यक्तींची माहिती घेऊन संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई करा, असेही श्री .गुप्ता यांनी यावेळी सांगितले. आजच्या आधुनिक युगातही स्त्री पुरूष समानता यावर सार्वजनिक पातळीवर चर्चा होत असली तरी तसेच याबाबत कायदे होत असले तरी मुलगी नको ही मानसिकता अद्यापही मनात मूळ धरलेली आहे . मुलगी जन्मास घालणाऱ्या महिलेचा खून करण्याचे दुर्देवी प्रकारही होतात. याशिवाय हुंडा व संशय या कारणावरून लाखो महिलांचा घरगुती हिंसाचारात बळी जातो. अनेकींचा छळ होतो. मात्र याविरोधात आता सरकार,कायद्यासह अनेक स्वयंसेवी संस्थाही पुढे आल्या आहेत. महिला सक्षमीकरणाचे सकारात्मक फायदेही दिसू लागले आहेत. ही बाब महत्वाची आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.