आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी, शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी प्राधान्य देऊन सातत्याने प्रयत्न केले आहेत. यापुढेही विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवून त्यांना सक्षम करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चना पाटील यांनी केले.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या तुळजापूर शाखेच्या वतीने सन्मान कर्तृत्वाचा, विकास जिल्ह्याचा या उपक्रमाअंतर्गत सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी पाटील बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी विलास जाधव, गटशिक्षणाधिकारी अर्जुन जाधव, पोलिस निरीक्षक आजिनाथ काशीद, अॅड. संजय भोसले, अॅड. संजय पवार, नंदा पुनगुडे, भाजपच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा अंजली बेताळे, शिक्षक संघटनेचे पदाधिकारी विक्रम पाटील, बिभीषण पाटील, काशीनाथ भालके, अभयकुमार यादव, पवन सूर्यवंशी, महादेव शिंदे आदींची उपस्थिती होती.
या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक शिक्षक समितीचे राज्य उपाध्यक्ष कल्याण बेताळे यांनी केले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव यांचेही भाषण झाले. कार्यक्रमासाठी , विकास चव्हाण, विशाल अंधारे, सुसेन सुरवसे, विजय देशमुख, बशीर तांबोळी, विलास कंटेकुरे, बाळासाहेब वाघमारे, बाबूराव कोकाटे, महेंद्र रणदिवे, रमेश बारस्कर, शिवाजी कवाळे, सविता पांढरे, भैरवनाथ कानडे, संजय भालेराव यांनी सूत्रसंचालन केले. बाळासाहेब घेवारे यांनी आभार मानले.
उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा झाला सन्मान
सीएमपी प्रणालीतून जिल्हाभरातील जवळपास पाच हजार शिक्षकांचे वेतन संबंधितांच्या बँक खात्यावर तत्काळ जमा करण्यासाठी कष्ट घेतलेल्या प्रत्येक तालुक्यातील सीएमपी समन्वयक, वित्त विभागाशी संलग्न लेखाअधिकारी व कर्मचारी, तुळजापूर तालुक्यातील तंत्रस्नेही शिक्षक, तुळजापूर तालुक्यातील आदर्श पुरस्कारप्राप्त, हिरकणी पुरस्कारप्राप्त व राज्यस्तरीय विविध उपक्रमात प्राविण्य मिळविलेले शिक्षक व शिक्षिका, पत्रकार यांच्यासह जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था, जिल्हा अल्पसंख्याक पतसंस्था, राजर्षी शाहू पतसंस्थेच्या संचालकांचा यावेळी सन्मानचिन्ह, शाल, पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.