आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्यावर्षी कोरोनाच्या छायेत दहावी आणि बारावी वर्गाच्या बोर्ड परीक्षा झाल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्याच शाळेत बोर्डाची परीक्षा देण्याची संधी मिळाली होती. यंदा मात्र, नियमित केंद्रावर परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी परीक्षेची तारीख निश्चित करण्यात आली आहे. दुसरीकडे यंदा दहावी आणि बारावीच्या बोर्डाची परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या परीक्षार्थींना परीक्षेच्या एक दिवस आधीपर्यंत परीक्षेचा अर्ज भरण्याची मुभा देण्यात आली आहे.
दरवर्षी बोर्डाकडून परीक्षा अर्ज भरण्यासाठी विद्यार्थी तसेच शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना विशिष्ट डेडलाइन देण्यात येते. त्यामुळे अनेकदा विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा फीस भरणे शक्य होत नसल्याने त्यांना परीक्षेपासून वंचित रहावे लागत असल्याचे समोर आले.
त्यामुळे यंदा बोर्डाकडून परीक्षेच्या एक दिवस आधी पर्यंत परीक्षा अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित रहावे लागणार नसल्याचे समोर आले. दोन्ही परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून त्यानुसार बोर्डाकडून तयारी करण्यात येत आहेत.
जिल्ह्यातील शाळा आणि कनिष्ठ विद्यालयांचे यूडायस मध्ये नोंदणी करण्याचे काम करण्यात येत असल्याने अद्याप जिल्ह्यात यंदा किती विद्यार्थी बसू शकतील हा आकडा मिळू शकला नाही. त्याचबरोबर कोरोनातील वर्ष वगळता नेहमी जशी निश्चित करण्यात आलेल्या केंद्रावर जाऊन परीक्षा द्यावी लागत होती. त्याचप्रमाणे यंदाही मुख्य केंद्रांवरच परीक्षा होणार आहे. उपकेंद्र सर्व रद्द करण्यात आले आहेत. गेल्या वर्षी दहावीला मुख्य केंद्र मुख्य केंद्र ८४ तर उपकेंद्र ३११ होते. तसेच बारावी बोर्ड परीक्षेला ३९ मुख्य केंद्र तर ११३ उपकेंद्र होते.
परीक्षेला १२ वी विज्ञान
शाखेचे सर्वाधिक विद्यार्थी १२ वी बोर्डाच्या परीक्षेत गेल्यावर्षी १६ हजार ७६४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यात चारही शाखांचा समावेश होता. त्यानुसार सात हजार २९६ विज्ञान शाखेसाठी, सहा हजार ६२२ कला, एक हजार ८७२ वाणिज्य तर नऊशे ७४ विद्यार्थी व्यावस
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.