आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराता.उस्मानाबाद येथील विविध विशाल कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत दोन्ही पँनेलचे दोन जागेवरील नामनिर्देशन पत्र छाननीत बाद ठरल्याने १३ पैकी दोन जागा रिक्त राहिल्या असून गावपुढाऱ्याचा फाॅर्म भरण्याचा गाफीलपणामुळे भटक्या विमुक्त जाती व इतर मागास प्रवर्गातील प्रत्येकी एक जागा रिक्त रहाणार आहे.
भा.ज..प.प्रणीत पॅनल व सर्वपक्षीय पॅनलने या निवडणुकीत अर्ज भरले आहेत. परंतु दोघांच्याही उमेदवारांचे दोन प्रवर्गातून भरलेले उमेदवारी अर्ज बाद झाल्याने दोन जागा रिक्तच रहाणार आहेत. तेर वि.का.सोसायटीच्या १३ जागासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून २ जानेवारी रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात आली त्यामध्ये ४२ अर्जापैकी ९ अर्ज छाननीत बाद ठरविण्यात आले. कर्जदार गटातील तीन उमेदवारांचे नावावर कर्ज नसताना या गटातून भरलेले अर्ज बाद ठरविण्यात आले. भटक्या विमुक्त जातीसाठी १ जागा आरक्षित होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.